Muralidhar Mohol News: मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा वापर करुन मागितली तीन कोटींची खंडणी;असा केला प्लॅन

Pune Crime News: संशयित आरोपींनी मोहोळ यांच्या मावसभावाचा देखील नंबरचाही गैरवापर केला.
Muralidhar Mohol News |
Muralidhar Mohol News |Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरून दोघा जणांनी व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी तीन कोटी रुपये द्या, अशी मागणी खंडणी खोरांनी केली आहे.या प्रकरणी राजेश व्यास यांनी या संदर्भात कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. (A ransom of three crores demanded using the name of Muralidhar Mohol; this was the plan)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश व्यास यांच्या तक्रारीवरुन संदीप पाटील, शेखर ताकवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप पाटील आणि शेखर ताकवणे यांनी त्यांच्या मोबाईलवर "कॉल मी" नावाचे एक ॲप डाऊनलोड केले. त्यात भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल क्रमांक सेव्ह केला. या ॲप द्वारे समोरच्या व्यक्तीला असे भासवले गेले की हा खरंच मोहोळ यांचाच नंबर आहे. तसेच संशयित आरोपींनी मोहोळ यांच्या मावसभावाचा देखील नंबरचाही गैरवापर केला.

Muralidhar Mohol News |
Maharashtra Politics: NDA सोबत सामील व्हा; केंद्रीय मंत्र्याची शरद पवारांना खुली ऑफर

या ॲपच्या माध्यमातून त्यांनी व्यवसायिक व्यास यांना फोन करून भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमाला पैसे लागणार आहेत. यासाठी तीन कोटी रुपये द्या, अशी खंडणी मागितली. हा सगळा प्रकार खोटा असल्याचे लक्षात येताच व्यास यांनी थेट कोथरुड पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तपासाची चक्रे फिरवत मोबाईल क्रमांकावरून शोध घेत आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com