NCP : सत्तारांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही ; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

Rupali Thombare Patil : अमोल मिटकरी, विद्या चव्हाण यांनीही सत्तार यांच्या या विधानावर तीव्र शब्दात निषेध करीत संताप व्यक्त केला आहे.
Rupali Thombare Patil
Rupali Thombare Patilsarkarnama
Published on
Updated on

Rupali Thombare Patil : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत खालच्या पातळीवर (Abdul Sattar Abused Supriya Sule) टीका केली आहे. अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानाचं राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी निषेध व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी सत्तार यांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. (Abdul sattar controversial statement)

राज्यात सत्तातर झाले तेव्हा सत्तार यांना ५० खोके मिळाले, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती, याबाबत त्यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सत्तार यांची जीभ घसरली, यावरुन राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य नेत्यांनीही सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Rupali Thombare Patil
Poonam Mahajan : माझ्या वडिलांना मारणाऱ्या मास्टरमाईंडचा शोध काँग्रेस-राष्ट्रवादीने का घेतला नाही ?

"सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत सत्तार यांनी माफी मागितली तरी त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, त्यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा. सुप्रिया सुळे यांच्याविषयी ते अशा भाषेत बोलतात, तर सामान्य व्यक्तीबाबत काय बोलत असतील, याची कल्पना करायला नको,मंत्री होण्याची त्यांची पात्रता आहे का," असा शब्दात रुपाली पाटील यांनी सत्तार यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी, विद्या चव्हाण यांनीही सत्तार यांच्या या विधानावर तीव्र शब्दात निषेध करीत संताप व्यक्त केला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनीही सत्तार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सुुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या..

सुप्रिया सुळेंनी अलीकडे अब्दुल सत्तारांना 50 खोके मिळाले का, असा प्रश्न केला होता, ज्यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का? असा प्रतिप्रश्न केला. सत्तारांच्या या प्रश्नाला प्रत्युत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, तुमच्याकडे 50 खोके असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका पुन्हा केली. ज्यावर आज सत्तारांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळेंना शिवागाळ करत तुम्हालाही देऊ असे उत्तर दिले. सत्तारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सत्तारांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com