Kasba By poll election : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय घडामोडींमुळे लक्षवेधी ठरत आहे. येथून टिळक कुटुंबात उमेदवारी दिली नाही म्हणून भाजपवर टिका केली जात आहे. तर काँग्रेसमध्येही बंडखरी झालेली आहे. त्यातच कसबा पोटनिवडणुकीच्या रिंगणात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी मंगळवारी त्यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichkule) यांनी पत्नी अलंकृता बिचुकले यांच्या नावे उमेदवारी अर्ज विकत घेतला होता. त्यानंतर मंगळवारी म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बिचुकले यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खास आपल्या शैलीत फटकेबाजी केली.
यावेळी अभिजीत बिचकुले (Abhijeet Bichkule) म्हणाले, जोपर्यंत मी विधानभवनात किंवा संसदेत जात नाही, तोपर्यंत निवडणूक लढणारय. दोन वर्षांपासून मी कसबा पेठेत राहतोय, मग येथील नागरिकांचे प्रश्न माझे नाहीत का? मध्यंतरी या परिसरात 'कसबा भकास झाला' असे काही बॅनर्स लागले होते. त्याच भकास झालेल्या कसब्याला आता सजवायला मी येत आहे.
अभिजित बिचुकले (Abhijeet Bichkule) यांनी आमदारकी, खासदारकीपासून ते अगदी राष्ट्रपतीपद अशा सर्व निवडणुका लढविल्या आहेत. २०१९ मध्ये त्यांनी वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना एकाही निवडणुकीत यश आले नाही.
आता कसबा पेठ विधानसभेसाठी आता भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasane) आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यासह अभिजित बिचुकलेही रिंगणात असणार आहेत. ते कसब्यातील जनतेला कोणत्या मुद्द्यावर साद घालून मतदानासाठी साद घलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लहुजी छावा संघटनेशी वाद
अभिजित बिचुकले मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी बाहेर लहुजी छावा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली. त्यावर बिचुकले यांनी त्यांना गळ्यातील लहुजींचा रुमाल काढावा लागेल, असे म्हटले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन इंगळे (Sachin Ingale) आणि अभिजित बिचुकले यांच्यात शाब्दिक वाद झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.