अजबच; वीज मीटर बंद करण्यासाठीही मागितली लाच; अभियंता एसीबीच्या जाळ्यात

Pimpri-Chinchwad : 50 हजाराची लाच मागणारा अभियंत्याला एसीबीने घेतले जाळ्यात
Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwadsarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad : पिंपरी : वीजजोड घेण्यासाठी लाच मागितली, तर समजू शकतो. तसा प्रकार यापूर्वी घडलेलाही आहे. पण, वीजजोड बंद करण्याकरिताही लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) घडला आहे. भोसरी एमआयडीसीतील एका कंपनीतील वीजमीटरचे कनेक्शन बंद करण्यासाठी 'महावितरण'च्या कनिष्ठ अभियंत्याने पन्नास हजार रुपये लाच म्हणून मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याबद्दल लाचखोरीचा गुन्हा दाखल करून या अभियंत्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज ताब्यात घेतले.

Pimpri-Chinchwad
श्रीकांत देशमुखांना कोर्टाचा दणका! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळाला..आता एकच पर्याय उरला

संतोषकुमार बाळासाहेब गित्ते (वय ३१) असे या लाचखोराचे नाव आहे. ते महावितरणच्या भोसरी उपविभाग कार्यालयात कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनिअर इंजिनिअर म्हणून तो काम करीत आहे. या घटनेतील तक्रारदाराने आपल्या कंपनीतील वीज मीटर कनेक्शन बंद करण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर कार्यवाही करण्याकरिता गित्ते याने पन्नास हजार रुपयांची लाच या कंपनी मालकाकडे मागितली. मात्र, त्यांना ती द्यायची नव्हती. म्हणून त्यांनी त्याबाबत `एसीबी`कडे तक्रार केली.

त्यांनी त्याची एकदा नाही, तर तीनदा खात्री केली अन् अखेरीस आज भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गित्तेविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यातही घेतले. एसीबीचे पीआय वीरनाथ माने पुढील तपास करीत आहेत. अशाप्रकारे शासकीय कामासाठी कोणी लाच मागत असेल, तर १०६४ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन `एसीबी`ने केले आहे.

Pimpri-Chinchwad
अबब! नेते आणि अधिकारी घेतात 40 टक्के कमिशन : कंत्राटदारांची CM कडे तक्रार

लाच मागितल्याचा या महिन्यातील पिंपरी-चिंचवडमधील दुसरा गुन्हा आहे. या दोन्ही घटनांतील तक्रारदार तरुणच आहेत. ३ तारखेला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना व विकास विभागातील सर्व्हेअर संदीप फकीरा लबडे (वय ४८) याने तीन लाख रुपये लाच मागितली म्हणून एसीबीने त्याला अटक केली होती. पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी नंतर लबडेला निलंबित करून त्याची खातेनिहाय चौकशी सुरु केली आहे. लबडेने एका तरुणाच्या कंपनीला विकास योजना अभिप्राय देण्यासाठी साडेतीन लाख रुपये लाच मागून नंतर तीन लाख रुपयांवर तडजोड केली होती‌.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com