ठाकरेंचे हिंदूत्व मान्य, दोन्ही कॉंग्रेससह त्यांच्या पाठिशी; आणखी एका पक्षाचा आघाडीला पाठिंबा

Uddhav Thackeray | लहान राजकीय पक्षांचा फायदा घेतल्यानंतर त्यांना संपवायचे, ही भाजपमध्ये प्रथा पडली आहे
ठाकरेंचे हिंदूत्व मान्य, दोन्ही कॉंग्रेससह त्यांच्या पाठिशी; आणखी एका पक्षाचा आघाडीला पाठिंबा
Published on
Updated on

पिंपरी : लहान राजकीय पक्षांचा फायदा घेतल्यानंतर त्यांना संपवायचे, ही भाजपमध्ये प्रथा पडली आहे. शिंदे गटाचेही (बाळासाहेबांची शिवसेना) तसंच होईल, असे सूचक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये काल (ता.१५)धम्मचक्र प्रवर्तन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

लहान पक्षांना बरोबर घेऊन त्यांचा फायदा घेतल्यानंतर त्यांना संपवायचे, शिंदे गटाचेही (बाळासाहेबांची शिवसेना) तसंच होईल,असे विधान आंबेडकर नुकतेच केले होते. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी खोडून काढले होते. त्यासंदर्भात विचारणा केली असता आंबेडकर म्हणाले की, शिवसेना राज्यात एक नंबरवर होती. भाजपला तिला दोन नंबर करायची होती. मग तीन, चार, व नंतर पार संपवा अशी त्यांची नीती आहे. म्हणून त्यांनी भांडण केलं.हे बावनकुळेंनी कबूल केले, म्हणून त्यांचे आभार मानतो,असा टोला त्यांनी मारला.

ठाकरेंचे हिंदूत्व मान्य, दोन्ही कॉंग्रेससह त्यांच्या पाठिशी; आणखी एका पक्षाचा आघाडीला पाठिंबा
Ajay Sarkar | हत्या दंगलीसारखे ११ गुन्हे; भाजपमध्ये गुंडाचा थाटामाटात प्रवेश...

अंधेरी (पूर्व), मुंबई विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप सोडून जो मागेल त्याला पाठिंबा देऊ,असे आंबेडकर म्हणाले. म्हणजे त्यांचे समर्थन हे महाविकास आघाडीच्या ऋतुजा लटके यांना असेल, हे स्पष्ट आहे. दोन्ही कॉंग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेलाही मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. फक्त प्रश्न असा आहे की या मदतीची कोणाला गरज आहे, ते आमच्याबरोबर बसतील, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे महाविकास आघाडीतील पक्षांना आघाडीसाठी आवताणच दिलं आहे.

आठ लाख भारतीय कुटुंबानी देश सोडल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ते ईडीच्या भीतीने गेले की त्यांच्याकडे निधी तथा पैसे मागितले म्हणून ते गेले हे ती कुटंबेच सांगू शकतील,असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com