विधान परिषदेची आमदारकी मिळण्यामागचे राम शिंदेंनी सांगितले कारण...

आमदार राम शिंदे यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थिबाबत बोलण्यास नकार दिला.
Ram shinde
Ram shindeSarkarnama
Published on
Updated on

कुरकुंभ (जि. पुणे) : पक्षावर निष्ठा ठेवणाऱ्या आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) न्याय दिला जाताे. त्यामुळेच मला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विधान परिषदेत काम करण्याची संधी दिली आहे, असे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी सांगितले. (Activist who is loyal to party gets justice in BJP : Ram Shinde)

Ram shinde
एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांसमोर हे तीनच पर्याय : शिवसेना टेक्निकल टीमने केले उघड!

विधान परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झालेले प्रा. राम शिंदे यांचा दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे भाजप किसान मोर्चा व कुरकुंभ ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी विधान परिषदेत आपल्याला संधी मिळण्याचे कारण सांगितले.

Ram shinde
एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट अपात्र कसा ठरणार?, ते प्रणिती शिंदेंनी स्पष्टपणे सांगितले!

या प्रसंगी आमदार राम शिंदे यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थिबाबत बोलण्यास नकार देऊन उपस्थितांशी औपचारिक गप्पा मारल्या. ते म्हणाले की विधानसभेच्या २००९ आणि २०१४ या दोन विधानसभा निवडणूका जिंकल्यानंतर मतदार संघात ज्या मिरवणुका निघाल्या होत्या. त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी मिरवणूक विधान परिषदेचे निवडणूक जिंकल्यानंतर नागरिकांकडून काढण्यात आली. त्यावरून मतदार संघातील जनतेचे प्रेम लक्षात येते, असेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले.

Ram shinde
ठाकरे सरकार पडतंय, याचं दुःख नाही; पण... : शेट्टींनी दिला भाजपला हा इशारा

या प्रसंगी भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे, मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश जगताप, वैभव आटोळे, कुरकुंभचे सरपंच आयुब शेख, सनी सोनार, सुनील पवार कुरकुंभ ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत भागवत व बापूराव झगडे, राहुल शितोळे, विकास काळे, नानासाहेब झगडे, चंद्रकांत जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com