Pune News : तब्बल 19 वर्षानंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर; पण पुन्हा न्यायालयाच्या कचाट्यात अडकणार?

Pune Market Committee Election : राज्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. आजपासून अर्ज भरण्यास सुरवात झाली.
Pune Market Committee Election News
Pune Market Committee Election NewsSarkarnama

Pune Market Committee Election News : राज्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. आजपासून अर्ज भरण्यास सुरवात झाली. मात्र, ताथवडे गावासह सात गावांचा समावेश पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत करण्यात आल्याचे त्यावर न्यायालयीन लढाईला सुरवात झाली आहे. येत्या काही दिवसात त्यावर सुनावणी होणार असल्याने जाहीर झालेल्या निवडणुकीचे भवितव्य काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

नवी मुंबईनंतर सर्वात मोठी असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुमारे १९ वर्षानंतर होत आहे. सातत्याने प्रशासकराज असलेल्या या काळात शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येतो. त्यामुळे यावेळी होणारी निवडणूक तरी बिनधोक व्हावी, अशी इच्छुकांची अपेक्षा आहे. मधल्या काळात हवेली आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समित्या अशा दोन बाजार समित्यांचा प्रयोग करण्यात आला. त्यानंतर पुन्हा दोन्ही मिळून एकच बाजार समिती करण्यात आली. पुणे (Pune)पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिका तसेच संपूर्ण हवेली तालुक्याच्या कार्यक्षेत्राचा समावेश पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत करण्यात आला.

Pune Market Committee Election News
Solapur News : सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का; माजी खासदार पक्ष सोडणार

न्यायालयीन लढाई झाली. न्यायालयाने (Court) दिलेल्या आदेशाप्रमाणे संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. मात्र, राज्य सरकारने परिपत्रक काढताना मुळशी बाजार समितीच्या हद्दीतील असलेल्या ताथवडेसह सात गावांचा समावेश पुणे बाजार समितीत केल्याने वादाला सुरवात झाली. त्यातून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मुळशीतील सात गावे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत घेण्याला याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे सुरू झालेल्या निवडणूक प्रक्रियेवर अनिश्‍चिततेचे सावट आहे.

या निवडणुकीत एकुण १८ संचालकांची निवड होणार आहे. यातील ११ जागा सोसायटी गटातून, चार जागा ग्रामपंचायत गटातून, दोन जागा व्यापारी गटातून तर एक जागा हमाल, तोलणार गटातून निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीसाठी साडेसतरा हजार मतदार आहेत. चारशे मतदारांसाठी एक मतदान केंद्र अशी रचना करण्यात येणार आहे.

Pune Market Committee Election News
Ahmednagar Bank On Ajit Pawar; अहमदनगर जिल्हा बँकेत काय घडले? अजितदादा म्हणाले, दिवसा आमच्याकडे अन् रात्री तिकडे

गटनिहाय मतदार पुढीलप्रमाणे

विविध कार्यकारी सोसायटी गट - ११ जागांसाठी एक हजार ८५२ मतदार

ग्रामपंचायत गट - चार जागांसाठी ७१३ मतदार

आडते-व्यापारी गट - दोन जागांसाठी १३ हजार ९७४ मतदार

हमाल-तोलणार गट - एका जागेसाठी दोन हजार सात मतदार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com