Pimpri-Chinchwad : होर्डिंग दुर्घटनेनंतर प्रशासनाला आली जाग; आता सर्व होर्डींगचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

Pune News : नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवडमधील मृतांच्या कुटुंबांना केलेल्या मदतीत राज्य सरकारचा भेदभाव
Pimpri-Chinchwad
Pimpri-ChinchwadSarkarnama

पिंपरी : वादळी वाऱ्यामुळे काल (ता.१७) सायंकाळी पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात पाचजण मृत्युमुखी पडले, तर तिघे गंभीर जखमी झाले. अशी तब्बल ४३४ बेकायदेशीर होर्डिंग्ज शहरात असल्याची माहिती खुद्द महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी आज दिली.

या होर्डिंग दुर्घटनेनंतर खडब़डून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने शहरातील सर्व (त्यांच्या लेखी फक्त १४०७) होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय आज घेतला. दरम्यान, या होर्डिंग दुर्घटनेनंतर शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी पालिका प्रशासन तथा प्रशासकांना आज लक्ष्य केलं. अनधिकृत होर्डिंग्जचे ऑ़डिट करण्याची मागणी त्यांनी केली. तर, मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे बेकायदेशीर होर्डिंग्ज विरुद्धची कारवाई रखडल्याची पळवाट आयुक्तांनी शोधली.

Pimpri-Chinchwad
Nana Patole News : ईडी आणि सीबीआय हे दोन बंदर अन् केंद्र सरकार मदारी !

दरम्यान, या होर्डिंग दुर्घटनेबाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर,'मनसे'चे माजी नगरसेवक सचिन चिखले तसेच धनाजी येळकर-पाटील, विनोद भंडारी, गणेश सकटे, दत्ता देवतरासे आदींनी ठरवले. त्यासाठी त्यांनी शवागाराबाहेरच रात्री धरणे धरले. मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्यानंतरच त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

Pimpri-Chinchwad
Satara News : उदयनराजेंच्या जावळी दौऱ्यावरुन शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, १५ वर्षानंतर त्यांचे दौरे सुरू झालेत....

मदतीबाबत सरकारचा भेदभाव

नवी मुंबईत रविवारी (ता.१६) झालेल्या राज्य सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत सरकारने जाहीर केली. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला मात्र, तीन लाख रुपयेच देण्याची घोषणा सरकारने केली.

राज्य सरकारच्या या सापत्नभावाबद्दल भापकर तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नवी मुंबईत मृत्युमुखी पडलेल्या श्री सेवकांचा जीव हा होर्डिंग दुर्घटनेतील मृतांपेक्षा अधिक मोलाचा आहे का अशी विचारणा त्यांनी केली.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com