Pimpri-Chinchwad: ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात राष्ट्रवादी मैदानात; तातडीने कारवाई करण्याची मागणी

NCP Candle March against Brijbhushan Singh: ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचा मोर्चा
Pimpri-Chinchwad
Pimpri-ChinchwadSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला.

पण त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी महिला कुस्तीपटूंनी आंदोलनही केलं. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आणि कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आता राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे.

ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केल्यानंतर गुन्हा दाखल होऊनही ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी अनेक दिवसानंतरही कारवाई केली नाही. त्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीने ब्रिजभूषण सिंह यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत त्यांच्या विरोधात तहसील कार्यालयावर मंगळवारी संध्याकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला.

Pimpri-Chinchwad
PCMC Bribe Case News: पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचखोरीचे सत्र थांबेना; आणखी एकाला अटक

महिला कुस्तीपटू गेल्या तीन महिन्यांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. पण कारवाईसाठी वेळकाढूपणा केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा प्रा.कविता आल्हाट यांनी यावेळी केला. तर गुन्हा दाखल झाल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य महिलांच्या प्रश्नांना न्याय मिळेल का? अशी विचारणा त्यांनी केली. ही कारवाई न झाल्यास चुकीचा संदेश जाण्याची भीतीही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

Pimpri-Chinchwad
NCP Candle March against Brijbhushan Singh : ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आता राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक..

दरम्यान, प्रा.आल्हाट, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, कार्याध्यक्ष कविता खराडे, भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्योती तापकीर, युवक स्वयंरोजगार प्रदेशाध्यक्ष मेघा पवार यांच्यासह आदी या कॅन्डल मार्च आंदोलनात सहभागी झाले होते.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com