Ajit Pawar Group Vs Padalkar : गोपीचंद पडळकरांविरोधात अजित पवार गट आक्रमक; पुण्यात जोडे मारो आंदोलन

BJP and NCP : आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर खोचक शब्दात टीका केली.
Pune NCP
Pune NCP

Pune News: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेनंतर आता अजित पवार गट आक्रमक झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्यावतीने (अजित पवार गट) पुणे शहरातील बालगंधर्व चौकात पडळकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

Pune NCP
NCP Ajit Pawar Group Vs Padalkar : आमदार पडळकरांच्या पवार कुटुंबावरील खोचक टीकेनंतर अजित पवार गट संतापला, दिला 'हा' इशारा

गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद तसा नवीन नाही. पडळकर यांच्याकडून कायमच पवार कुटुंबावर शेलक्या भाषेत टीका करण्यात येते. मात्र, आता पडळकरांच्या विरोधात अजित पवार गट आक्रमक झाला आहे.

गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद पुण्यासह मावळमध्येही उमटले आहेत. अजितदादांच्या समर्थकांनी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर उतरत सोमटने फाटा येथे पडळकरांच्या विरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.

शहराध्यक्ष दीपक मानकर यांनीही पडळकरांना निशाणा साधला. तसेच पडळकर पुणे शहरात आल्यानंतर त्यांचे कपडे उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला. तर पडळकरांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हे वक्तव्य केले असल्याचे प्रत्युत्तरही मानकरांनी दिले.

प्रदीप देशमुख यांनीही पडळकरांना प्रत्युत्तर देत विकासाच्या मुद्द्यावरून आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो. पण आता यात कोणतीच कटुता येवू नये, यांचे सर्वांनीच भान ठेवायला हवे, असे ते म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

Pune NCP
Mungantiwar At The Protest Site : श्रेय कुणालाही द्या; आंदोलकांचा जीव महत्वाचा, म्हणत दोन तासांनी माघारी फिरले मुनगंटीवार !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com