Chandrapur Political News : मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये, या प्रमुख आणि अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांचे मागील आठ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुटावे, यासाठी राज्याचे वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिष्टाई केली. (Forest Minister and District Guardian Minister Sudhir Mungantiwar graced the occasion.)
आंदोलनाची धुरा सांभाळणाऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे उपोषण सोडण्याचे श्रेय कुणालाही द्या, मात्र आंदोलकांचा जीव महत्त्वाचा आहे, असा सल्ला देऊन तब्बल दोन तासांनी उपोषण मंडपातून मुनगंटीवार माघारी फिरले. ओबींसींच्या वतीने काल (ता. १७) चंद्रपुरात मोर्चा काढला. या मोर्चाला ओबीसी समाजातील जवळपास सर्वच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, (Vijay Wadettiwar) माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. परंतु उपोषण सुटले नाही. दरम्यान, आज मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) भाजप नेते देवराव भोंगळे, भाजपचे शहरअध्यक्ष राहुल पावडे यांच्यासह दुपारी दोन वाजता उपोषण मंडपात पोहोचले. या वेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिन राजुरकर, दिनेश चोखारे, डॅा. संजय घाटे, प्रा. अनिल डहाके, मनिषा बोबडे, पुरुषोत्तम सातपुते उपस्थित होते.
मुनगंटीवार यांनी आंदोलकांशी चर्चा केली. उपोषणकर्ते टोंगे यांची विचारपूस केली. येत्या सात दिवसांत ओबीसीच्या शिष्टमंडळाची बैठक लावतो. ओबीसींच्या वसतिगृहासाठी पाच सदस्यीय समिती करणे. या वसतिगृहांमध्ये केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाची अट रद्द करणे आणि सरसकट ओबीसी विद्यार्थ्यांनी सामावून घेण्याचा अध्यादेश काढण्याचे आश्वासन मुनगंटीवार यांनी चर्चेत दिले.
सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. त्यात कोणत्याही नव्या जातीचा समावेश केला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. हा विषयसुद्धा निकाली निघाला आहे, याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले. मात्र, चर्चेला उपस्थित ओबीसींच्या प्रतिनिधींनी आधी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बैठकीची मागणी लावून धरली.
दरम्यान, मुनगंटीवार ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष प्रा. बबनराव तायवाडे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलले. बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांच्याशीसुद्धा आंदोलकाचे बोलणे करून दिले. तब्बल दोन तास ही चर्चा सुरू होती. परंतु तोडगा निघाला नाही. उपोषण सोडण्याचे श्रेय कुणालाही द्या. मात्र, आंदोलकांचा जीव वाचवा, असा सल्ला आंदोलनाची धुरा सांभाळणाऱ्यांना उपोषण मंडप सोडताना सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.