Ajitdada Again Absent Pune program : पुण्यातील कार्यक्रमाला अजितदादांची पुन्हा दांडी; पण हे आहे कारण....

क्रांतीअण्णा अरुण लाड अभ्यासिकेचे उद्‌घाटन आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र, या कार्यक्रमाला पवार पुन्हा गैरहजर राहिले आहेत.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

NCP News : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पहाटेच्या शपथविधीवरून जुगलबंदी रंगलेली असताना विरोधी पक्षनेते अजित पवार मात्र मौन बाळगून आहेत. ते नाराज आहेत का, अशी चर्चा रंगली आहे. कारण, पुण्यातील एका कार्यक्रमाला ते पुन्हा अनुपस्थित राहिले आहेत. त्यामुळे अनुपस्थितीची चर्चा चांगलीच रंगली आहे. (Ajit Pawar again absent from the program in Pune)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) विधान परिषदेचे आमदार अरुण लाड यांच्या पुढाकारातून पुण्यातील सदाशिव पेठेत सुरू करण्यात आलेल्या क्रांतीअण्णा अरुण लाड अभ्यासिकेचे उद्‌घाटन आज विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते होणार होते. मात्र, या कार्यक्रमाला पवार पुन्हा गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे.

Ajit Pawar
Shinde-Fadnavis Givernment : शिंदे-फडणवीस सरकारविरोधात अशोक चव्हाण आक्रमक ; 'या' आयुधाचा वापर करणार

या कार्यक्रमासाठी संपूर्ण तयारीही करण्यात आली होती. मंडप आणि फ्लेक्सही उभारण्यात आले होते. या अभ्यासिकेचे उद॒घाटन आज सकाळी दहा वाजता होणार होते. मात्र, त्याचवेळी अजित पवारांकडून ते येणार नसल्याचा निरोप आला, त्यामुळे खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते अभ्यासिकेचे उद॒घाटन करावं लागलं. त्यामुळे अजितदादांच्या गैरहजेरीची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

Ajit Pawar
Samrudhhi Mahamarg Accident : मुलाला महाविद्यालयात सोडले अन॒ काळाने डाव साधला...; ‘समृद्धी’वरील अपघतात पती-पत्नीसह मुलीचा मृत्यू

पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. फडणवीसांच्या आरोपाला पवारांनी उत्तर दिले, पवारांनी केलेल्या वक्तव्याला फडणवीस यांनी पुन्हा एकदा उत्तर दिले. ते देताना शरद पवारांनी मला नाही तर आपल्या पुतण्याला क्लिनबोल्ड केलं, असे म्हटले होते. पवार-फडणवीसांना जुगलबंदी रंगलेली असताना अजित पवारांचे मौन बरंच काही सांगून जात होतं.

Ajit Pawar
Maratha Reservation Issue : पंकजाताई, तुमच्या राजकारणासाठी मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका ; ‘सकल मराठा’चे माऊली पवारांनी सुनावले

कार्यक्रम रद्द करण्याचे अजितदादांनी सांगितले कारण....

दरम्यान, अजित पवार यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे जाहीर केले आहे. याबाबत ट्विट करत पवार यांनी माहिती दिली आहे. ट्विटमध्ये अजितदादांनी म्हटले आहे की, समृध्दी महामार्गावर खासगी बसच्या अपघातात झालेला प्रवाशांचा मृत्यू आणि त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवलेल्या दुर्दैवी प्रसंगानंतर राज्यात सर्वत्र दुःखाचं वातावरण आहे. अशा दुःखद मनस्थितीत कुठल्याही जाहीर कार्यक्रमांना उपस्थित राहणं मला शक्य नाही. मी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. कृपया, याची नोंद घ्यावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com