Ajit Pawar News : अजितदादा बारणेंच्या प्रचाराला आले, आता पार्थ पवार येणार का?

Maval Lok Sabha Constituency : मावळात घडामोडींना वेग आला असून आघाडीच्या मेळाव्याला काँग्रेसची दांडी, तर युतीच्या बैठकीला सर्वांची झाडून हजेरी.
Ajit Pawar, Shrirang Barne, Parth Pawar
Ajit Pawar, Shrirang Barne, Parth PawarSarkarnama

Maval political News : मावळ लोकसभेतील युतीचे (शिवसेना) उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी मित्रपक्ष राष्ट्रवादीचे अजित पवार हे सोमवारी (ता. 8) पिंपरीत येऊन गेले. त्यांनी युतीच्या पहिल्या संयुक्त बैठकीला हजेरी लावली. त्यांचे पुत्र पार्थ Part Pawar यांचा गत लोकसभेला बारणेंनी पराभव करूनही ते आल्याने त्याची मोठी चर्चा झाली. उमेदवार म्हणून आता पार्थ यांनाही प्रचारासाठी बोलावणार असल्याचे बारणे यांनी या बैठकीनंतर सांगितले. त्यामुळे पार्थ यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. Ajit Pawar Campaign for Shrirang Barne in Maval.

राजकारणात स्थित्यतंरे होत असल्याने मनाला लावून घ्यायचे नसते, असे बारणे म्हणाले. चिंचवडचे दिवंगत भाजप आमदार लक्ष्मण जगतापांविरोधात Laxman Jagtap मी 2009 च्या विधानसभेला लढलो होतो. 2014 च्या लोकसभेलाही ते माझे प्रतिस्पर्धी होते. पण, 2019 च्या लोकसभेला, त्यांनी माझे काम केले, प्रचार केला होता. त्यामुळे आताही येणाऱ्या काळात असेच चित्र दिसेल, असा दावा करत बारणेंनी अजितदादानंतर पार्थ पवारही आपल्या प्रचाराला येतील, असा विश्वास व्यक्त केला.

अजितदादा Ajit Pawar हा मनात कटूता न ठेवणारा मोठा नेता असून ते न बोलवताही स्वतःहून आल्याने पार्थही येतील, असा दावा बारणेंनी Shrirang Barne केला. माझी उमेदवारी जाहीर होताच स्वतः फोन करीत कधी सभा, बैठक आहे, मी येतो असे अजितदादा म्हणाले होते, असेही बारणेंनी यावेळी आवर्जून सांगितले. मात्र, पार्थ हे त्यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार Sunetra Pawar यांच्या प्रचारासाठी बारामतीत लोकसभा मतदारसंघात व्यस्त आहेत. त्यामुळे ते मावळात येतील का, याची उत्सुकता मावळकरांना लागली आहे.

Ajit Pawar, Shrirang Barne, Parth Pawar
BJP Politics : आयारामांना पायघड्या अन् निष्ठावंतांना 'गाजर'; मोहोळच्या क्षीरसागर बंधूंबाबत भाजपचं जरा चुकलंच

दरम्यान, रविवारी मावळमधील महाविकास आघाडीचा मेळावा पिंपरी-चिंचवडमध्ये पार पडला. त्या मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकल्याने त्याला गालबोट लागले. तर, सोमवारी शहरात मावळ युतीची बैठक दणक्यात झाली. त्याला सर्वपक्ष व त्यांच्या नेत्यांनीही झाडून हजेरी लावली होती.

बारणेंच्या उमेदवारीला टोकाचा विरोध केलेले मावळचे अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंसह Sunil Shelke मावळमधून इच्छुक असलेले माजी राज्यमंत्री भाजपचे बाळा भेगडे हे सुद्धा उपस्थित होते. अजितदादा येणार असल्याने नेहमीसारखी पक्षाची शहरातील सारी नेतेमंडळी व प्रमुख कार्यकर्तेही हजर होते.

(Edited by Sunil Dhumal)

Ajit Pawar, Shrirang Barne, Parth Pawar
Solapur BJP : 'सोलापूर, माढ्यात भाजपविरोधात वातावरण'; अजित पवार गटाच्या नेत्यानेच पेटवली वात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com