सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढण्याचा सरकारचा डाव : अजित पवार 

 सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढण्याचा सरकारचा डाव : अजित पवार 
Published on
Updated on

बारामती : सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढण्याचा भाजप शिवसेना सरकारचा प्रयत्न असून हा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला. बारामतीत आज राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 

सरकारने नुकताच एक अध्यादेश काढलेला असून अंतरानिहाय उसाला भाव देण्याचा हा फतवा आहे. साखर कारखान्यापासून 25 कि.मी.च्या आतील सभासदांना वेगळा, 50 कि.मी. च्या अंतरातील शेतक-यांना वेगळा भाव देण्याचा सरकारचा डाव आहे. हा अध्यादेश म्हणजे उस उत्पादक सभासदांना कमालीचे नुकसान होणार असून या बाबत मुंबईत गेल्यावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी बोलणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. हा आदेशच चुकीचा असून आम्ही हे खपवून घेणार नाही असा इशारा 
त्यांनी दिला. 

कर्जमाफी करण्याबाबत बॅंकांना लाल, हिरव्या व पिवळ्या याद्या पाठविण्यात आल्या आहेत, या रंगनिहाय याद्यांचे नेमके काय होणार हे शेतक-यांना समजतच नसल्याचे ते म्हणाले. पूर्वी पाच टक्के लोकांनी कर्जमाफीमध्ये चुकीचे काम केले म्हणून आज उर्वरित सर्वांनाच वेठीस धरण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

एसटीचा संप असो वा अंगणवाडी सेविकांचा, शिक्षकांच्या बदल्या असो किंवा कर्जमाफीचा मुद्दा असो टोकाचे निर्णय घेण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे दिसत असून सरकारने जरा सबुरीने वागावे, असा सल्ला अजित पवार यांनी या वेळी दिला. लोकशाहीमध्ये इतके टोकाचे निर्णय जनता मान्य करत नाही, सर्वांना सोबत घेऊन तारतम्य ठेवून निर्णय घ्यावे 
लागतात याचा विसर सरकारला पडल्याचे ते म्हणाले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com