मला आणि माझ्या बहिणीसाठी सुरक्षित मतदारसंघ बावनकुळेंनाच विचारणार; पवारांचा टोला

Ajit Pawar : भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना स्वतःचा पक्ष उमेदवारी देत नाही.
Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar Latest News
Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

पुणे : अजूनही सरकार स्थिरस्थावर नाही, कोर्ट अजूनही तारीख पे तारीख देत आहे. त्यामुळे त्यांना अजूनही कळत नाही की सुप्रीम कोर्ट काय निकाल देईल, मात्र, यांनी कितीही आव आणली तरी त्यांच्यावर टांगती तलवार कायम आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना स्वतःचा पक्ष उमेदवारी देत नाही, पत्नीला दिलेली उमेदवारी देखील पुन्हा काढून घेतली जाते. ही त्यांची विश्वासाहर्ता. यांनी माझ्याकडे येऊन काय गप्पा माराव्या. मी खंबीर आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी कॅाग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवारांनी बावनकुळेंवर खोचक शब्दात टीका केली आहे. त्यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.

Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar Latest News
पंकजा मुंडेंच्या मनात काय चाललयं?,अमित शहांच्या बहुचर्चित दौऱ्यापासून दुरच!

अजित पवार म्हणाले, ते नुसत्या गप्पा मारायचं काम करतात, ज्या माणसाला स्वतःचा पक्ष उमेदवारी देत नाही, पत्नीला दिलेली उमेदवारी पण पुन्हा काढून घेतली जाते. ही यांची विश्वासाहर्ता यांनी माझ्याकडे येऊन काय गप्पा माराव्या. मी खंबीर आहे. महाराष्ट्रात अजून कुठे मला आणि माझ्या बहिणीला मतदारसंघ मिळतोय का बघतो, कारण आता आम्ही तिथे हरणार म्हंटल्यावर तिथे थांबून कसं चालेल, मी त्यांनाच विचारणार आहे की, असा कोणता मतदारसंघ ठेवणार आहे का? जिथे आम्ही निवडुन येऊ शकतो, अशा खोचक शब्दात पवारांनी बावनकुळेंना टोला लगावला.

याकूब प्रकरणी बोलतांना पवार म्हणाले की, ज्या व्यक्ती चांगल्या असतात त्यांच्या बाबत चांगल्या गोष्टी घडव्या आणि ज्या व्यक्ती देशाला काळिमा फासणाऱ्या असतात, समाजाला घातक असतात अशा व्यक्तींचा उदोउदो करण्याचं कारण नाही. तसेत भाजपला महागाईवर बोलता येत नाही. शेतकऱ्यांना मदत करत नाही. म्हणून ते लोकांचं लक्ष दुसरीकडे विचलित करत आहेत. याबरोबरच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या जागेवरून सुरू असलेल्या वादावर बोलतांना ते म्हणाले की, न्यायालयात याबाबत निर्णय घेईल, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवजीपार्क वरील दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती आणि त्याच मैदानावरून सांगितले होते की, इथून पुढे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे ही जबाबदारी निभावतील आणि तेच बाळासाहेबांचं आणि शिवसैनिकांच म्हणणं आहे, असे मत पवारांनी व्यक्त केले.

Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar Latest News
Atul Londhe: ‘ती’ चूक भाजपने मुद्दामहून केली, कारण त्यांना धार्मिक शांतता भंग करायची आहे !

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आता निवडणूका घ्यायला हरकत नाही. जसे ग्रामपंचायतच्या निवडणूक जाहीर झाल्या. तशाच इतरही जाहीर व्हायला हव्या. आम्ही शिवसेनेबरोबर मुंबई महापालिका निवडणूक लढवाव्यात ह्या मताचा मी आहे, मात्र काँग्रेचा निर्णय काँग्रेस घेईल. पालकमंत्री लवकरात लवकर भाजप आणि शिंदे सरकारने निवडले पाहिजे. सर्वच सणाच्या निमित्ताने पालकमंत्री नेमले पाहिजे, आम्ही सरकारमध्ये नाही त्यामुळे आम्ही काय निर्णय घेऊ शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावत शिवसेनेच्या चिन्हाच्या वादावर बोलतांना ते म्हणाले की, तज्ञांचं मत आहे की, शिवसेनेचा सर्व निकाल उद्धव ठाकरे यांच्यांच बाजूने लागेल. मात्र तारीख पे तारीख सुरू असल्याने आम्हालाही काही सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वावनकुळे यांनी नुकताच बारामती दौरा केला असून बारामती जिंकण्याचा निर्धार केला आहे. यावर पवारांनी खोचक शब्दात बावनकुळेंचा समाचार घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com