Ajit Pawar News : मला समजून सांगता येत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितले अन् राहुल कलाटेंनाही सूचक इशारा

Chinchwad by-election : पिंपरी-चिंचवडमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभा घेतली.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News : चिंचवडमध्ये आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात झालेल्या बंडखोरीचा संदर्भ देत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतही ती औरंगाबादमध्ये झाल्याचे सांगितले.

अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महाविकास आघाडीचे चिंचवड पोटनिवडणुकीचे उमेदवार नाना काटे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. यावेळी अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Ajit Pawar News
Chinchwad By-Election : आमदार जगताप आणि टिळक गंभीर आजारी असतानाही भाजपने स्वार्थीपणा केला: अजित पवार असं का म्हणाले?

चिंचवड पोटनिवडणुकीत ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी प्रयत्न करुनही कलाटे यांनी माघार घेतली नाही. आज अजित पवार यांनी नाव न घेता राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, या निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघात आघाडीत (राष्ट्रवादीत) बंडखोरी झाली होती.

चिंचवडप्रमाणे त्या बंडखोराचीही समजूत काढण्याचा प्रयत्न मी वगळता सर्वांनी केला. कारण मला समजून सांगता येत नाही, असे ते म्हणताच उपस्थितांत हशा पिकला. बरं झालं मी या बंडखोराला फोन करूनही तो लागला नाही, असे ते पुढे म्हणताच आणखी हशा पिकला.

Ajit Pawar News
Eknath Shinde News: शिंदेंना बालेकिल्ल्यातच रोखण्याचा भाजपाचा डाव? श्रीकांत शिंदेंच्या मतदार संघात हालचाली वाढल्या

चिंचवडप्रमाणे औरंबादमध्येही बंडखोराने माघार घेतली नाही. पण, त्याची परिणती त्याला अवघी चारशे मते मिळण्यात झाली, असे सांगत चिंचवडमधील बंडखोराचीही, अशीच गत होणार असल्याचे त्यांनी सूचित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com