Ajit Pawar : विधानपरिषदेत धडा शिकवला, आता जागा दाखवून देऊ; अजित पवारांचा इशारा!

Sate Government : राज्यात घटनाबाह्य, स्थगिती सरकार असल्याचेही केलं वक्तव्य
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune MVA : हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचं असल्यांचं सतत सांगितलं जातं. मात्र हे सरकार घटनाबाह्य आहे, स्थगिती सरकार आहे. त्या सरकारला विधानपरिषदेत मतदारांनी धडा शिकवला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातूनही या सरकारला जागा दाखवून देऊ, अशी टीका राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पुणे येथे केले आहे.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, विधानपरिषदेच्या (MLC) नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि कोकणात निवडणुका झाल्या. त्यात फक्त कोकण येथे भाजपला यश मिळालं आहे. मात्र तेथील ज्ञानेश्वर म्हात्रे हे मूळचे शिवसेनेचे (Shivsena) आहेत. त्यामुळे त्या निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे.

Ajit Pawar
S. Jaishankar : मागच्या वर्षी तब्बल 'सव्वा दोन लाख' भारतीयांनी सोडले नागरिकत्व : मंत्री जयशंकरांनी दिली माहिती!

त्या निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना नाकारून घटनाबाह्य सरकारला जागा दाखवून दिली आहे. आताही कसबा आणि चिंचवड विधानसभेत त्यांचा पराभव करावा. यातून गद्दारांना मतदार कसे नाकारतात, हे देशाला दाखवून देण्याची वेळ आल्याचे पवार यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणुकांसाठी (By Election) २६ फेब्रुवारी रोजी मतदान आहे. त्यामुळे आता प्रचारासाठी थोडेच दिवस बाकी आहेत. कमी दिवस असल्याने नेटाने काम करा. कसब्यात काँग्रेसच्या वतीने रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना निवडून आणण्याासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन पावर यांनी यावेळी केले.

Ajit Pawar
Babasaheb Deshmukh : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशीच शेतकऱ्यांची वीज तोडणी; बाबासाहेब देशमुखांच्या पोस्टची चर्चा

पुढे बोलताना अजित पवार यांनी एकजुटीची ताकद महत्वाची असल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले की, यापूर्वी मतदारांचे विभाजन झाल्याने या ठिकाणी भाजपचा विजय होत होता. आज स्थिती वेगळी आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि इतर पक्ष एकत्र आहेत. त्यामुळं मतांची विभागणी होणार नाही. आता आपली एकजूट राहिली पाहिजे. त्यातून आपला विजय निश्चित होईल, असाही विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com