Ajit Pawar: बालेकिल्यात अजितदादांना दोन महिन्यानंतरही मिळेना जिल्हाध्यक्ष

Pimpri Chinchwad NCP District President: गव्हाणे यांनी तीस माजी नगरसेवक,पदाधिकारी आणि शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह १७ जुलै रोजी शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश केला.ते ही भोसरीतून विधानसभेला इच्छूक आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट)चे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष अजित गव्हाणे यांनी १६ जुलै रोजी पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून हे पद रिक्त आहे.विधानसभा निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता असून बालेकिल्ला असलेल्या शहरातच कॅप्टन नसल्यामुळे पक्षात उलटसुलट चर्चा आहे.

येत्या १५ दिवसांत नवा अध्यक्ष अजित पवार हे उद्योगनगरीला नवा अध्यक्ष देणार असल्याचे या पक्षाच्या विश्वसनीय सूत्रांनी 'सरकारनामा'ला सांगितले. सांगितले. या पदासाठी नाव चर्चेत असलेले ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर योगेश बहल,माजी विरोधी पक्षनेते नाना काटे असे तिघे आमदारकीसाठी इच्छूक असल्याने ते हे पद घेण्याची शक्यता कमी आहे.

बहल हे विधानपरिषदेला, तर भोईर, काटे हे चिंचवडमधून विधानसभेला इच्छूक आहेत. या तिघांसह माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ,कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे,मयूर कलाटे,शाम लांडे, जगदीश शेट्टी, यांचीही नावे या पदासाठी घेतली जात आहेत. मात्र, भोंडवे, कलाटे, शितोळे यांनी चिंचवड विधानसभेची जागा पक्षाकडे घेण्यासाठी बंडाचा इशारा दिल्याने त्यांचे नाव आता या पदासाठी राहणार की जाणार याविषयी उत्सुकता आहे.

Ajit Pawar
BJP News: ठरलं! भाजपचे उमेदवार एक ऑक्टोबरला ठरणार; 'या' प्रक्रियेतून होणार निवड

गव्हाणे यांनी तीस माजी नगरसेवक,पदाधिकारी आणि शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह १७ जुलै रोजी शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश केला.ते ही भोसरीतून विधानसभेला इच्छूक आहेत. मात्र,महायुतीत तिकिट मिळण्याची शक्यता नसल्याने ते आघाडीचे मिळावे यासाठी त्यांनी घरवापसी केली आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर शहर अध्यक्षपद गेले ६० दिवस रिक्त आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने ते तातडीने भरण्याची मागणी पक्षातून होत आहे.

कॅप्टनशिवाय निवडणुकीला कसे सामोरे जाणार, असा सवाल पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते विचारत आहेत. दरम्यान,मराठा आरक्षण आंदोलनाचा लोकसभेला या पक्षासह महायुतीला राज्यात जोरदार फटका बसला. त्यामुळे आता नवीन शहराध्यक्ष हा अजितदादा पुन्हा मराठाच देण्याची शक्यता आहे.

अध्यक्ष निवडीचा अधिकार शहर पक्षाने त्यांनाच दिला आहे.ते विधानसभा निवडणूक जाहीर होण्य़ापूर्वी नक्की अध्यक्ष देतील, असे शहर कार्याध्यक्ष फजल शेख 'सरकारनामा'ला सांगितले. त्यांच्यासह सध्या चार कार्याध्यक्ष पक्षाचा गाडा अध्यक्ष नसल्याने शहरात हाकत आहेत. पण, त्यातील भोंडवे आणि शितोळेंनी इशारा देत बंडाचा झेंडा फडकावल्याने त्यांचे नाव अध्यक्ष पदासाठी गाळले जाण्याची शक्यता आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com