Assembly Election 2024 : पुण्यात भाजपचा आमदार असलेल्या मतदारसंघावर अजितदादांच्या 'NCP' कडून दावा, राडा होणार?

NCP VS BJP : . इंदापूर, मावळ, शिरूर आणि वडगाव शेरीसारख्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार असताना येथे भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र...
Ajit Pawar, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Devendra Fadnavis NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात महायुतीतील मित्र पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजितदादा पवार ) बहुतांश जागांवर भाजपच्या नेत्यांनी दावा केल्यानं वादा उफाळला आहे. इंदापूर, मावळ, शिरूर आणि वडगाव शेरीसारख्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार असताना येथे भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, आता भाजपचे आमदार असलेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा केला आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे वरिष्ठ नेते, चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) हे विद्यमान आमदार आहेत. येथून चंद्रकांत पाटील हेच निवडणूक लढतील, हे निश्चित मानलं जात आहे. असे असताना कोथरूड मतदारसंघावर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून दावा सांगण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष विजय डाकले यांनी कोथरूडमधून निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं आहे. "मागील विधानसभा निवडणुकीवेळी अजितदादा पवार यांनी आपली उमेदवारी घोषित केली होती. परंतु, नंतर माघार घेण्यास बोललं गेलं. मात्र, यंदा निवडणूक लढवायची याच्यावरती आम्ही ठाम आहोत," असा निर्धार विजय डाकले यांनी व्यक्त केला.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Supriya Sule News : राज्याचा मुख्यमंत्री कसा व्हावा; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

"सध्या कोथरूडमध्ये रस्ते, कचरा वाहतुकीसह अनेक प्रश्न आहेत. कोथरुडमध्ये सतत वेळ देणारा आमदार हवा, अशी कोथरुडकरांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्व अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना कार्यकर्त्यांच्या भावना कळविल्या आहेत. कोथरुड मतदारसंघात राष्ट्रवादी तसेच इतर पक्ष संघटनाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडणूक लढण्यासाठी आग्रह करित आहेत," असं डाकले यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com