Vilas Lande: भाचा अजित गव्हाणेसोबत मामा विलास लांडे यांची का झाली नाही शरद पवार राष्ट्रवादीत घरवापसी

Ajit Pawar NCP Leader Ajit Gavhane Resigns From his Post: भोसरीतून लढण्याची तयारी गव्हाणे यांनी गेल्यावेळीच केली होती. मात्र, ते जमले नाही. यावेळी,मात्र 'अभी नही, तो कभी नही', असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
Vilas Lande News
Vilas Lande NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri : वर्षभरातच अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये त्यातही भोसरीत काल (बुधवारी) मोठा भूंकप झाला. दोन माजी महापौरांसह वीस माजी नगरसेवकांनी पक्षाला सोड़चिठ्ठी दिली. ते घरवापसी करणार असून येत्या शनिवारी (ता.२०) शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का अजितदादांना त्यांच्या आवडत्या शहरात बसला आहे.

वर्षभरापूर्वी अजित पवारांनी पक्ष फोडला तेव्हा त्यांच्याबरोबर उद्योगनगरीतील ९० टक्के राष्ट्रवादी गेली होती. तीच बहूतांश आता पुन्हा परतणार आहे. त्यात अजित पवार राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष भोसरीकर अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांच्यासह या विधानसभा मतदारसंघातील बहूतांश माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत. मात्र,त्यात भोसरीचे प्रथम आमदार,गव्हाणेंचे मामा आणि शरद पवार यांना दैवतासमान मानणारे विलास लांडे हे नाहीत. त्यामुळे त्याची शहरात आणि त्यातही भोसरीत मोठी चर्चा आहे. त्यामागील कारणांचा शोध घेतला असता वेगळीच माहिती हाती आली.

गव्हाणे यांना आता महापालिकेतून विधानसभेत जायचे वेध लागले आहेत. त्यासाठी भोसरीतून लढण्याची तयारी त्यांनी गेल्यावेळीच केली होती. मात्र,ते जमले नाही. यावेळी,मात्र अभी नही, तो कभी नही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

मात्र, त्यांचा पक्ष म्हणजे अजितदादा महायुतीत आहे. तर,महायुतीतील भाजपचे महेश लांडगे हे तेथे आमदार आहेत. त्यांनाच महायुतीचे तिकिट मिळण्याची दाट शक्यता आहे. परिणामी आपले उमेदवारीचे दार बंद झाल्याचे लक्षात येताच गव्हाणेंनी घरवापसी करायचे ठरवले. भोसरीत उमेदवारी देण्याच्या अटीवर ती होत आहे.

Vilas Lande News
Marathi Language Elite Status: पवारांनी चिमटा काढल्यानंतर CM शिंदे लागले कामाला; 'मराठी'ला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार?

भोसरीतून गव्हाणेंनाच आघाडीकडून म्हणजे शरद पवार राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार असल्याचे नक्की झाल्याने लांडेंचा भोसरीतून पुन्हा विधानसभा लढण्याचा मार्ग बंद झाला.त्याचा परिणाम म्हणून त्यांनी भाच्यासह घरवापसी न करता अजितदादांसोबत राहायचे ठरवल्याचे समजले.

राज्यपाल नियुक्त १२ सदस्य विधान परिषदेवर नियुक्त केले जाणार आहेत. तेथे त्यांची वर्णी लावण्याचे आश्वासनही त्यांना देण्यात आले असल्याची चर्चा आहे.दोन वर्षात भाजपने पिंपरी-चिंचवडमधील दोघांना विधान परिषदेवर घेतले.दरम्यान,त्यानंतर आता पक्षामध्ये उद्योगनगरीत भूंकपच झाल्याने अजितदादा डॅमेज कंट्रोल म्हणून शहरातील लांडेंसारखेच ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर अशा कुणाला,तरी विधानपरिषद देतील,असा अंदाज आहे. आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणूक लक्षात घेता ही खेळी ते खेळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com