Ajit Pawar's Warning : 'भीमा पाटस'कडे १०० कोटींची थकबाकी; अजित पवारांचा कारवाईचा इशारा..

Ajit Pawar On Bhima Patas : भीमा पाटसकडून थकीत पैसे आले नाहीत, तर...
Ajit Pawar News :
Ajit Pawar News : Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील दौंड तालुकास्थित भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याने (Bhima Patas Sahkari Sugar factory) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (पीडीसीसी) जवळपास १०० कोटींपेक्षा अधिक कर्ज थकवलेली आहे. ही थकबाकी भरण्यासाठी बँकेने या कारखान्याला एकरकमी परतावा (वन टाइम सेटलमेंट) करून देण्याबाबत सवलत दिली गेली होती. मात्र यासाठी देण्यात आलेली मुदत संपूनही ते चार पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे.

याबाबत अधिकची माहिती घेतली असता, काही तांत्रिक अडचण उद्भवल्याने, ही रक्कमेची फेड करता आलेली नाही. असे सांगितले जात आहे. मात्र आता ही थकबाकीची पूर्तता न झाल्यास जिल्हा बॅंकेकडून भीमा पाटस कारखान्यावर या थकबाकी वसूलीच्या दृष्टीने नियमांनुसार कारवाई करणार, असे या बँकचे संचालक व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.२१) रोजी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Ajit Pawar News :
Akkalkot Bazar Samiti : पाटील-कल्याणशेट्टी जोडीला म्हेत्रेंचे आव्हान; ‘गोल्डन गॅंग, भस्मासूर, उचल्या गॅंग’; प्रचारात शेलक्या शब्दांचा वापर

पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या वतीने आज पत्रकार परिषद घेतली गेली. या पत्रकार परिषदेत अजित पवार संवाद साधत होते. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष रमेश थोरात, माजी मंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार अशोक पवार, बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक भालचंद्र जगताप, प्रवीण शिंदे, निर्मला जागडे, पूजा बुट्टे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते सुरेश घुले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई आदि उपस्थित होते.

अजित पवार पुढे म्हणाले, ‘‘संबंधित कारखान्यावर पुणे जिल्हा बॅंकेप्रमाणेच, राज्य सहकारी बँकेचेही कर्ज आहे. या कर्जाच्या थकबाकीसंदर्भात जिल्हा बँकेने राज्य बँकेकडूनही माहिती प्राप्त केली आहे. तेव्हा राज्य बँकेच्या म्हणण्यानुसार, ज्या कंपनीला हा कारखाना चालवायला दिला आहे, त्या कंपनीने कर्नाटकमधील ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे. त्या बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य नाही. त्यामुळे काही अडचणी आहेत. या तांत्रिक अडचणीमुळे भीमा पाटस कारखान्याला थकबाकी भरण्यासाठी आणखी काही काळ मुदत दिली जाईल. तरीही भीमा पाटसकडून थकीत पैसे आले नाहीत, तर बॅक कायद्यातील तरतुदीनुसार पुढील कायदेशीर कारवाई करेल.’’

जिल्हा बॅंकेला गेल्या आर्थिक वर्षात ३५१ कोटी ३९ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. सध्या बँकेच्या एकूण ठेवी ११ हजार ४८१ कोटींच्या झाल्या आहेत. मार्च २०२३ अखेरपर्यंत एकूण ७ हजार ९७४ कोटी ३ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. चालू वर्षी बँकेच्या शाखेमध्येच शेतकऱ्यांना अवघ्या २० रूपयांत ई सातबारा उतारा उपलब्ध करून देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

Ajit Pawar News :
Satara News : पृथ्वीराज चव्हाणांच्या मागे किती आमदार; त्यांनी आत्मपरिक्षण करावे...शंभूराज देसाई

पुणे जिल्हा बँक ही भारतातील एकमेव अग्रेसर बँक ठरली आहे. बँकेकडून आता गुगल पे सुविधा उपलब्ध झाली आहे. यासोबतच दुष्काळी भागातील अडचणीत असलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी दहा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. तसेच बँकेच्या नोकरभरतीसंदर्भात एजन्सी नियुक्त करण्यासाठी सहकार विभागाला पत्र पाठविण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com