बारामती : राज्यावर असलेले कोरोनाचे (Corona Virus) संकट अद्याप काही कमी झालेले नाही. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या (Corona Patient) कमी होत चालली होती. पण आता पुन्हा कोरोना (Covid-19) रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. अशामध्ये राज्याची चिंता वाढवणारी गोष्टी समोर आली आहे. (Omicron Variant news update)
कोरोनाच्या ओमायक्रॅान व्हेरिएटचे (Omicron Variant) नवे उत्परिवर्तन असलेले बीए.4 आणि बीए.5 ने महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. या व्हेरिएंटचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. पुण्यात या व्हेरिएंटचे सात रुग्ण सापडल्याने चिंता वाढली असून दक्षता घेण्यात येत आहे
पुण्यात नवीन व्हेरिएंटचे कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीच याची दखल घेतली आहे. या बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत चर्चा करुन पुढील उपाययोजना ठरवली जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी रविवारी बारामतीत दिली. ते माध्यमांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, "पुण्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट बीए4 व बीए 5 या दोन्हीचे मिळून सात रुग्ण आढळले आहेत. हे विषाणू अधिक संसर्गजन्य असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे,"
"या पूर्वी तामिळनाडू व तेलंगणात अशा व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले होते, आता पुण्यात सात जणांना याचा संसर्ग झाल्याने आरोग्य विभागाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत सोमवारी (ता. 30) राजेश टोपे यांच्याशी चर्चा करुन या बाबत पुढील उपाययोजना ठरवून त्या बाबतची माहिती दिली जाईल. याबाबत काही गंभीर बाबी असतील तर त्याची माहितीही जनतेला दिली जाईल, जेणेकरुन काय काळजी घेतली पाहिजे हे सांगितले जाईल," असेही पवार यांनी सांगितले.
'नवाब मलिक यांचा राष्ट्रवादीला विसर पडला आहे,' असे आरोप होत असल्याबाबत विचारल्यानंतर आम्हाला कोणाचाही विसर पडलेला नाही, 'आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत,' असेही अजित पवार म्हणाले. दुसरीक़डे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खतांसह बी बियाण्यांची टंचाई भासू नये यासाठी कृषी विभागाला सूचना देण्यात आल्या असून मुख्यमंत्र्यांनी या बाबतची बैठक घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या या आठवड्यामध्ये 500च्या वर गेली असल्याने चिंता निर्माण झाली आहे. जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा निर्बंध लावण्यात येतील अशी माहिती काल मंत्री अस्लम शेख यांनी दिली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.