Ajit Pawar News: अजितदादांचा लंकेंना इशारा;...तसा निर्णय घेतला तर आमदारकी सोडावी लागेल!

Nationalist Congress Party Sharadchandra Pawar: नीलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी वेगळा निर्णय घेऊ नये, अशी माझी त्यांना विनंती आणि आवाहन आहे.
Nilesh Lanke Ajit Pawar
Nilesh Lanke Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून सुजय विखे यांचे तिकीट फायनल झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चा सुरू आहेत. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लंकेंना थेट इशारा दिला आहे.

"नीलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी वेगळा निर्णय घेऊ नये, अशी माझी त्यांना विनंती आणि आवाहन आहे. आमची कालच भेट झाली. मात्र, तसा निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना आमदारकी सोडावी लागेल. नाहीतर ते अपात्र होतील, असे सांगत अजितदादांनी लंकेंना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्यापासून रोखले आहे.

Nilesh Lanke Ajit Pawar
Kolhapur Politics: सस्पेन्स कायम; महायुती- माविआमध्ये संभ्रम; कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये...

'मी अनुभवलेलं कोविड' या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने नीलेश लंके पुण्याकडे निघाले आहेत. त्यावेळी अनेक कार्यकर्ते त्यांच्या घरासमोर जमले होते. त्यांच्या घरासमोर तुतारी वाजत होती. याबाबत लंके यांनी सूचक विधान केले आहे. "वेळ आणि काळच उमेदवार ठरवेल" असे लंके म्हणाले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास पवार उपस्थित राहणार आहेत, अशीही चर्चा आहे. या वेळी लंकेचा पक्ष प्रवेश होईल, असे समजते.

अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. या वेळी ते बोलत होते. काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदार नीलेश लंके यांची पुन्हा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात घरवापसी होणार अशी चर्चा आहे. लोकसभेच्या अहमदनगर मतदारसंघातून लंके निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

कालच लंके मला भेटले. पण लंके यांना वेगळा निर्णय घ्यायचा असेल, तर आमदारकी सोडवी लागेल. नाहीतर ते अपात्र ठरतील. कायद्यानुसार, एखाद्याने पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली, तर त्याच्याविरोधात पक्ष कारवाई करू शकतो.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com