Ajit Pawar News : मुख्यमंत्री व्हायचं केवळ दिवा स्वप्नच! रोहित पवारांच्या 'त्या' बॅनरवर अजितदादांची मिश्किल टिप्पणी

Maharashtra Politics : असे बॅनर लावून काहीही उपयोग नाही. केवळ कार्यकर्त्यांना समाधान मिळते.
Ajit Pawar, Rohit Pawar
Ajit Pawar, Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लागलेल्या बॅनरवर त्यांचा 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावर खोचक प्रतिक्रिया देत रोहित पवारांना टोला लगावला आहे. पिंपरी येथे ते बोलत होते.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर रोहित पवारांचे 'भावी मुख्यमंत्री' असे बॅनर त्यांच्या समर्थकाने लावले आहेत. हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनरबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजितदादा म्हणाले, "कार्यकर्ते आपल्या नेत्याचे असे बॅनर लावत आहेत. त्यामुळे 'भावी मुख्यमंत्री' व्हायचं कोणी शिल्लकच राहणार नाही. कार्यकर्त्यांना मी मागे सांगितले होते की असे बॅनर लावू नका, कारण असे बॅनर लावून काहीही उपयोग नाही. केवळ कार्यकर्त्यांना समाधान मिळते. अशा प्रकारचे बॅनर कोणी लावायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण मुख्यमंत्री होण्यासाठी मॅजिक फिगर १४५ चा आकडा गाठावा लागतो. नाहीतर मुख्यमंत्री व्हायचं हे केवळ दिवा स्वप्नच राहते."

Ajit Pawar, Rohit Pawar
Manoj Jarange News : मनोज जरांगे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; मराठा समाजाच्या बैठकीत मोठा निर्णय; पुढील लढ्याबाबत महाराष्ट्रभर...

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजितदादांवर गंभीर टीका केली आहे. पडळकरांच्या टीकेला अजितदादांनी उत्तर देणं टाळलं. "राज्यात वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. अशा विधानावर मत व्यक्त करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा गोष्टीकडे मी लक्ष देत नाही. त्यांच्यावर बोलण्यापेक्षा मी माझ्या कामावर लक्ष देतो," अशा शब्दांत अजितदादांनी पडळकरांवर बोलणं टाळलं."धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत," अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती.

मराठा आरक्षणावर अजित पवार म्हणाले, "मराठा आरक्षणाच्या उपोषणकर्त्यांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. गिरीश महाजन यांच्यासह अनेक नेते त्या ठिकाणी गेले होते. त्यांची चर्चा झाली. वेगवेगळ्या समाजातील आरक्षणाला धक्का न लावता मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत असले पाहिजे."

Edited By : Mangesh Mahale

Ajit Pawar, Rohit Pawar
Rohit Pawar News : 'भावी मुख्यमंत्र्यां'च्या यादीत वाढ; ज्येष्ठ नेत्यांनंतर पहिल्यांदाच आमदार झालेल्या रोहित पवारांचेही बॅनर झळकले ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com