Ajit Pawar Death: पुण्यासाठी घेतलेला "तो' निर्णय ठरला अखेरचा! दादांचे आभार मानण्याची संधी मिळालीच नाही...

Ajit Pawar Death News Nilesh Nikam Reaction: "मी आभारसाठी, कृतज्ज्ञता व्यक्त करण्यासाठी दादांना फोन करत होतो, दादा विमान प्रवासात होते. त्यांच्याशी बोलणे झाले नाही, त्यांचे आभार मानण्याचे राहून गेले..."
 Ajit Pawar Death News
Ajit Pawar Death NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात बुधवारी सकाळी निधन झाले. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अजितदादांबाबत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी अजितदादांनी अक्षरशः रात्रंदिवस एक करत प्रचारामध्ये जीव ओतला, पण पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष दुसरा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला. त्यामुळे महापालिकेत विरोधी पक्ष नेता पदासाठी सक्षम चेहरा देण्याचे अधिकार पवार यांना देण्याचे ठरावाद्वारे निश्‍चित झाले आणि पवार यांनीही अँड.निलेश निकम यांना विरोधी पक्ष नेता करण्याचा निर्णय मंगळवारीच घेतला. त्याबद्दल पवार यांच्याशी बोलून आभार व्यक्त करण्याची संधी मात्र निकम यांना मिळालीच नाही !

महापालिका निवडणुकीसाठी पवार हे एक महिन्यापासून पुण्यात तळ ठोकून होते. त्यांनी महापालिका निवडणुकीत झंझावाती प्रचार केला. लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादानंतर आपल्या पक्षाला चांगली संधी मिळण्याची अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली होती. मात्र निकालानंतर त्यांच्या पदरी निराशा आली. तरीही, पक्षाने भाजपनंतर सर्वाधिक जागा मिळवीत दुसरा क्रमांक मिळविला.

त्यामुळे विरोधी पक्षनेता पद राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्याच वाट्याला आले. त्यामुळे विरोधी पक्ष नेते पदी कोणाची निवड करायची, याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे यांनी नगरसेवकांची बैठक घेतली होती. त्यामध्ये विरोधी पक्ष नेता पदाच्या नाव ठरविण्याचा अधिकार पवार यांना देण्याचा ठराव केला होता. त्यानुसार, पक्षाने 3 ते 4 नावे दादांसमोर मांडली होती. त्यानुसार, पवार यांनी मंगळवारी निलेश निकम यांच्या नावाला पसंती दर्शविली होती. पवार यांच्या आदेशानुसार, पक्षाने अँड निलेश निकम यांचे नाव निश्‍चित केले होते.

 Ajit Pawar Death News
Ajit Pawar Plane Carsh: 45 सेकंदांमध्ये काय झाले! अजितदादांच्या विमान अपघाताचा CCTV फुटेज समोर

दरम्यान, विरोधी पक्ष नेतेपदी निवड केल्याबद्दल निकम हे पवार यांचे आभार मानण्यासाठी बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून पवार यांच्याशी संपर्क साधत होते. मात्र पवार यांचा फोन बंद होता. आठ वाजता त्यांनी पुन्हा फोन केल्यानंतर त्यांना दादा विमान प्रवासात असल्याने त्यांच्या स्वीय सहायकाशी बोलण्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सुनील टिंगरे यांच्याकडून निकम यांना पवार यांच्या निधनाचे वृत्त समजले. "मी आभारसाठी, कृतज्ज्ञता व्यक्त करण्यासाठी दादांना फोन करत होतो, दादा विमान प्रवासात होते. त्यांच्याशी बोलणे झाले नाही, त्यांचे आभार मानण्याचे राहून गेले.' असे सांगताना निलेश निकम यांचा कंठ दाटून आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com