64 कारखाने विकले...मला एकट्याला का टार्गेट करता?

64 कारखाने विकले...मला एकट्याला का टार्गेट करता?

साखर कारखान्याबाबत एनसीबी, पोलिस आणि सहकार विभागांसारख्या वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी करुनही काहीही निष्पन्न झालं नाही.

पुणे: राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या (Cooperative sugar factories) घोटाळ्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. मात्र मी यावर उत्तर देणं टाळलं. साखर कारखान्याबाबत एनसीबी (NCB), पोलिस (Police) आणि सहकार विभागांसारख्या (Cooprative department) वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी करुनही काहीही निष्पन्न झालं नाही. विरोधकांनी साखर कारखान्यासंदर्भात खोटी आकडेवारी जाहीर करुन आरोप केले. कारखान्यासंदर्भात 25 हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप हा खोटा आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी यावेळी जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणाऱ्या सर्व टीकांना प्रत्युत्तर दिलं.

64 कारखाने विकले...मला एकट्याला का टार्गेट करता?
''स्मार्ट सिटी घोटाळा हा १००वा घोटाळा, अजून ९९ बाकी''

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ''नियम सर्वांसाठी सारखेच असतात, त्यामुळे आज सगळी कागदपत्रचं घेऊन आलो आहे, असे म्हणत अजित पवारांनी आरोप करणाऱ्यांवर टिकास्त्र डागलं. राज्यात केवळ जरंडेश्वर हा एकमेव साखर कारखाना नाही. राज्यभरातील अनेक कारखान्यांची यादी वाचून दाखवत अजित पवारांनी हे कारखाने कोणाचे आहेत, ते कोणी कितीला विकत घेतले याची माहितीच त्यांनी सांगितली. तसेच, कारखान्यांच्या घोटाळ्याप्रकरणी आपल्या नातेवाईकांची बदनामी केली जात आहे, तर माध्यमांमध्येही काहींकडून मला बदनाम करण्यासाठी माझ्याविरुद्ध गरळ ओकली जात आहे. पण मी काय आहे ते संपुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.''

''राज्यातील 64 सहकारी साखर कारखाने विकत घेतले गेले आहेत,तर काही कारखाने एकाने विकत घेऊन दुसऱ्याला चालवायला दिलेत. राज्य सरकारच्या परवानगीने राज्यातील शिखर बँकांनी 30 सहकारी साखर कारखाने विकले. तर जिल्हा मध्यवर्ती बँकानी सहा सहकारी साखर कारखाने विकले. तर तीन सहकारी साखर कारखाने स्वत कारखान्यांनीच विकले. तर राज्यातील बारा सहकारी साखर कारखाने सध्या भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्यात आल्याचे'' त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी पुण्यातील वाहतूक कोंडीच्या समस्येवरही भाष्य केले. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकात वाहतूकीची होणारी कोंडी पाहता या चौकातील पुणे मेट्रो पुलाचे काम दिवाळीच्या आसपास सुरु केले जाईल. या मेट्रोच्या उभारणीसाठी नागपूर मेट्रो पॅटर्न वापरणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी स्वत: या पुलाच्या भूमिपूजनाला येणार आहोत. तसेच, मेट्रोच्या उड्डाणपुलाचं काम वेगान पूर्ण करण्याची ग्वाही यावेळी अजित पवारांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com