Ajit Pawar Vs Rohit Pawar : रोहित पवारांचे लहानपण काढत अजितदादांचा पलटवार; म्हणाले...

Baramati Lok Sabha Constituency : आम्ही कामाची माणसे आहोत. सकाळी सहा वाजल्यापासून विकास कामे करतो. आता त्यांनी वेल्हे तालुक्यातील जिल्हा बँके उघडी असल्याचा आरोप केला, त्या बँकेची सीसीटीव्ही फुटेज तपासून पहावेत.
Rohit Pawar, Ajit Pawar
Rohit Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

रविकिरण सासवडे

Baramati Political News : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. ७) मतदान पार पडले. यावेळी सकाळपासून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी अजित पवार गटावर अनेक गंभीर आरोप केले. मतदारसंघात झालेल्या कथित गैरप्रकारांचे काही व्हिडिओसुद्धा त्यांनी व्हायरल केले. हे सर्व आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फेटाळताना रोहित पवारांवर पलटवराही केला. मी त्याला लहानपणापासून ओळखतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरसमज पसरवण्याचे काम करत आहे, असा घणाघात अजितदादांनी केला.

काटेवाडी येथे अजित पवारांनी मंगळवारी सायंकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, रोहित पवार Rohit Pawar हे अलीकडच्या पिढीचा आहे, त्यामुळे त्यांना सोशल मीडिया कसा वापरायचा याचे चांगले ज्ञान आहे. आम्ही कामाची माणसे आहोत. सकाळी सहा वाजल्यापासून विकास कामे करतो. आता त्यांनी वेल्हे तालुक्यातील जिल्हा बँके उघडी असल्याचा आरोप केला, त्या बँकेची सीसीटीव्ही फुटेज तपासून पहावेत. मात्र रोहित सोशल मीडियामध्ये इतका पोहोचलेले आहेत, की हे फुटेज तो कालचेच आहे हे दाखवू शकतात. सध्या त्यांना काही उद्योग नाहीत. त्यामुळे ते माझ्याबद्दल वेडेवाकडे काहीतरी आरोप करून गैरसमज निर्माण करत आहेत, अशा शब्दांत अजित पवारांनी रोहित यांचा समाचार घेतला.

पैसे वाटपाच्या आरोपांवर अजित पवार Ajit Pawar म्हणाले, मी तुमच्याशी बोलत असताना कुणीतरी माझ्या गाडीमध्ये पाचशेच्या नोटा टाकल्या आणि त्याचे शूटिंग केले, तर तुम्ही लगेच म्हणणार की माझ्याकडे नोटा सापडल्या. निवडणूक आयोग पोलिस प्रशासन अशा बाकीच्या यंत्रणा आहेत, त्या प्रकाराची चौकशी करावी. पारदर्शकपणे निवडणुका पार पडल्या पाहिजेत. सध्या रोहित पवारांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरसमज पसरवणे एवढे एकच काम आहे. परवाच्या सभेतही त्यांनी नौटंकी केली. मी त्याला लहानपणापासून ओळखतो. त्याने व्हिडिओमध्ये दाखवलेली माणसे त्यांना विचारा दूध का दूध पाणी का पाणी होईल, असे आवाहनही पवारांनी केले.

इंदापूरमध्ये घडलेल्या धमकीप्रकरणी अजित पवारांनी आमदार दत्तात्रय भरणे Dattatray Bharne यांची पाठराखण केली. आमदार भरणेंचा व्हिडिओ पाहिला असून त्यांची म्हणणेही जाणून घेतले. त्यातून संबंधित ठिकाणी किरकोळ वाद सुरू होता. त्यातून एका व्यक्तीला मारहाण झाली असती. ते टाळण्यासाठी भरणेंनी हस्तक्षेप केला. त्याबाबत कोणतीही पोलिस तक्रार देणार नाहीत. विरोधकांनी बहुदा तक्रार केली आहे. आता यावर उत्तर द्यायचे झाले तर वकिलाच्या मार्फत देईल, असे भरणेंनी स्पष्ट केले. भरणे तिथे गेले नसते, त्यांनी हस्तक्षेप केला नसता तर नक्कीच काहीतरी अनर्थ घडला असता.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com