Ajit Pawar News : 'कल्याणीनगर' प्रकरणात पोलिसांना फोन केला होता? अजित पवार म्हणाले, 'दोषी असेल तर मलाही...

Pune Hit and Run Case Ajit Pawar Clarifies about phone call after allegation from Anjali Damania : पुणे अपघात प्रकरण दडपण्यासाठी केलेले अनेक गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. अपघात झाला त्यावेळी स्थानिक आमदारांनी पोलिसांवर दबाव आणल्याचे पुढे आले. त्यानंतर चालकावर दबाव आणण्याने आरोपीचे वडील आणि आजोबांना अटक केली.
Anjali Damania, Ajit Pawar
Anjali Damania, Ajit PawarSarkarnama

Maharashtra Political News : पुण्यातील हिट अॅन रन प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या अपघात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असूनही त्यांना अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरेंनी मदत केल्याचा आरोप होत आहे. मात्र या घटनेवर पहिले काही दिवस चकार शब्द काढला नसल्याने पालकमंत्री अजित पवारांना उद्देशून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया काही प्रश्न उपस्थित केले. तसेच या अपघात प्रकरणी पवारांनी पोलिस आयुक्तांना फोन केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. यावर अजितदादांनी सडेतोड उत्तर देत दमानियांचे आरोप फेटाळले आहेत. Ajit Pawar News

कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने आपल्या पोर्शे कारने दोन युवकांना धडक दिली. यात युवकांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी मुलास वाचवण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव आल्याचे उघडकीस आले. अपघाताचा योग्य तपास न करता पोलिसांनी आरोपीस व्हिआयपी ट्रिटमेंट दिली. यानंतर सर्व स्तरातून सडकून टीका होऊ लागल्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी Amitesh Kumar स्वतः लक्ष घालून योग्य ती कारवाईची दक्षता घेतली. हे सर्व होत असताना पहाटे उठून काम करणारे पालकमंत्री अजित पवार शांत होते. याकडे लक्ष वेधत अंजली दमानियांनी त्यांच्या चुप्पीबाबत संशय व्यक्त केला.

अंजली दमानियांच्या Anjali Damania या आरोपांवर अजित पवार म्हणाले, तसे तर मी कुणाला वाचवण्यासाठी कधीही फोन करत नाही. काही काम असेल तर थेट पोलिस आयुक्त किंवा ग्रामीणचे पोलिस अधिक्षकांनाच फोन करतो. मात्र पुण्यातील अपघात प्रकरणी कुणावरही कुठलाही दबाव नाही. गुन्हा करून कुणीही पळवाट काढू शकत नाही. दोषी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आता यात मी दोषी आढळलो तर मलाही शिक्षा द्यावी, असे वारंवार सांगतो. कुठल्याही प्रकरणात राजकीय दबाव आहे असे विरोधात असताना म्हणण्याची पद्धत असते, असे म्हणत अजित पवारांनी Ajit Pawar दमानिया यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Anjali Damania, Ajit Pawar
Pune Hit And Run Case : पुणे अपघाताने राजकीय वातावरण तापलं; मुश्रीफांची धंगेकरांना 'वॉर्निंग'! काय आहे कारण?

दरम्यान, पुणे अपघात प्रकरण Pune Hit And Run Case दडपण्यासाठी केलेले अनेक गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. अपघात झाला त्यावेळी स्थानिक आमदारांनी पोलिसांवर दबाव आणल्याचे पुढे आले. त्यानंतर चालकावर दबाव आणण्याने आरोपीचे वडील आणि आजोबांना अटक केली. तसेच आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून अहवालात फेरफार केल्याचेही आता पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितले. त्यातून ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. या अपघात प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत असल्याने हे प्रकरण देशभर चर्चेले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Anjali Damania, Ajit Pawar
Ramesh Kadam : माजी आमदार रमेश कदम यांना कोर्टाचा दिलासा; पोलिस कोठडीची मागणी फेटाळली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com