Pune BJP News : छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’नव्हे ‘स्वराज्यरक्षक’ होते, असं मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात बोलताना व्यक्त केले होते. मात्र याच मुद्द्यावरुन आता भाजप आक्रमक झाले आहे. या विधानाच्या निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहेत.
अजित पवारांच्या या वक्तव्याच्या विरोधात आज पुण्यातील डेक्कन येथील खंडोजी बाबा चौकात भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजीही करण्यात आली.
यावेळी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.
यावेळी मुळीक म्हणाले, ''छत्रपती संभाजी महाराजांचे कर्तृत्व थोर आहे. त्यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करणे विरोधी पक्षनेत्यांना शोभत नाही. छत्रपती संभाजी राजांचा अपमान हा शिवछत्रपती घराण्याच्या कर्तृत्वाचा, माता जिजाऊंच्या संस्कारांचा आणि समस्त हिंदुजनांच्या अस्मितेचा अपमान असून तो कदापी सहन केला जाणार नाही. त्यामुळे अजित पवारांनी संपूर्ण देशाची माफी मागावी'', अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
दरम्यान, यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, युवा मोर्चा अध्यक्ष बापू मानकर, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दिपक नागपुरे, संदिप लोणकर, प्रतिक देसरडा, दिपक पवार, राजू परदेशी, सुनील शर्मा, यांच्यासह नगरसेवक, शहर पदाधिकारी आणि युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.