Ajit Pawar: ठेकेदार व्हायचे असेल तर राजकारणात येऊ नका; अजितदादांनी केली कार्यकर्त्यांची कानउघाडणी

Ajit Pawar slams political leaders Baramati News:ठेकेदारांच्या कामाच्या दर्जावरून सरकारला होणारा त्रास आणि कामातील विलंबावर अजितदादांनी आपल्या खुमासदार शैलीत भाष्य केले. पिपंळी (ता. बारामती ) येथील ग्रामसचिवालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

रवीकिरण सासवडे

काटेवाडी (पुणे) : विकास कामाच्या दर्जावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकवेळा ठेकेदार, अधिकाऱ्यांनी धारेवर धरले आहे. कामाच्या दर्जावरुन त्यांनी ठेकेदारांना झापले आहे. यातील अनेक ठेकेदार हे राजकीय पदाधिकारी किंवा नेत्यांच्या नातेवाईक असतात.

सरकारी कामाचा ठेका मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षाची वाट धरणारे अनेक कार्यकर्ते असतात. अशा व्यक्ती ज्यांना राजकारण येऊन ठेकेदार व्हायचं असते त्यांची कानउघाडणी अजितदादांनी शनिवारी बारामती केली.

ठेकेदारांच्या कामाच्या दर्जावरून सरकारला होणारा त्रास आणि कामातील विलंबावर अजितदादांनी आपल्या खुमासदार शैलीत भाष्य केले. पिपंळी (ता. बारामती ) येथील ग्रामसचिवालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी गावातील विकासकामे, शेती आणि स्थानिक समस्यांवर मोकळेपणाने भाष्य केले.

"ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी ठेकेदार बनू नये आणि ज्यांना ठेकेदारी करायची आहे त्यांनी राजकारणात येऊ नये," असा सणसणीत टोला अजित पवार यांनी पिंपळीतील नवीन ग्रामसचिवालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना लगावला.

अपुऱ्या निधीमुळे अनेक कामे प्रलंबित राहतात, त्यावर "आता निधी मागण्याची गरज नाही, योजनेतूनच सगळी कामे होतील. थोडी मेहनत घ्या," असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले. गावातील रस्त्यांवरील अडथळ्यांबाबत एका तरुणाच्या तक्रारीवर त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिले, "मीच टिकाऊ आणि खोरं घेऊन येतो, पैसे देण्याचं माझं काम आहे, वाद मिटवून काम करणं तुमचं,"

Ajit Pawar
MVA Politics: महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर? सांगलीतील शिवसैनिकांची थेट मातोश्रीवर जाऊन ठाकरेंकडे तक्रार

गावातील एका वादावरही अजितदादांनी मजेशीर टिप्पणी केली, "मी इथे उखाणे घ्यायला आलो आहे का? काम करायला आलो आहे," अजितदादांच्या या विधानावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

शेती आणि दुग्धविकासावर बोलताना अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, "वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमार्फत शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी १८ हजार रुपये दिले जात आहेत. यापुढे ही रक्कम कृषी विभागामार्फत देण्याचा विचार आहे. काल मी ५६ लिटर दूध देणारी गाय बघितली," असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com