Ajit Pawar Politics : अजितदादांनी शेवटच्या क्षणी गेम फिरवला; भाजपच्या बंडखोरांना 'बळ', पुण्यासाठी खास 'रणनीती'

Ajit Pawar NCP Vs BJP PMC Election : उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी खास रणनीती आखत भाजपच्या बंडखोरांना बळ दिल्याचे दिसले. भाजपसोबतच काँग्रेस, मनसेचे माजी नगरसेवक देखील राष्ट्रवादीच्या गळाला लागले.
Ajit Pawar PMC Election 2025
Ajit Pawar PMC Election 2025sarkarnama
Published on
Updated on

Pune Politics : भाजपमधून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तासापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यास पसंती दिली.

याबरोबरच काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाराज उमेदवारांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व प्रभागांसाठी उमेदवार असतानाही ऐनवेळी प्रवेश करणाऱ्या अन्य पक्षांमधील इच्छुकांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने भाजपसमोर तगडे आव्हान उभे केल्याचे चित्र आहे.

पुण्यात भाजपची चांगली ताकद असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीत बरोबर घेणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला साद घालत बरोबर घेण्यासाठी प्रयत्न केले. त्यामध्ये त्यांना यश आले. दरम्यान, भाजपच्या उमेदवारांची नावे पक्षाने सोमवारी उघड केली, त्यानंतर भाजपमधील इच्छुक उमेदवारांमध्ये चांगलीच नाराजी पसरली.

प्रारंभी भाजपचे माजी नगरसेवक धनंजय जाधव, शंकर पवार यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री पवार यांच्या पक्षात प्रवेश करत भाजपविरुद्ध दंड थोपटले होते. त्यांच्यासोबत सोमवारी काँग्रेस पक्षाचे दत्ता बहिरट, मनसेचे जयराज लांडगे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नीता मंजाळकर, आनंद मंजाळकर यांनीही राष्ट्रवादीची वाट धरली. ऐनवेळी पक्षामध्ये प्रवेश करूनही राष्ट्रवादीने त्यांनाही उमेदवारीची संधी दिली आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल मंवगळवार शेवटचा दिवस असताना देखील भाजपकडून उमेदवारी मिळणार की नाही याबाबत अनेकांना स्पष्ट कल्पना नव्हती. भाजपचे बहुतांश उमेदवारांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाने आपले तिकीट कापल्याचे भाजपच्या माजी नगरसेवकांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वेगवान हालचाल करत राष्ट्रवादीला जवळ केले. मंगळवारी भाजपच्या चार माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

Ajit Pawar PMC Election 2025
BJP Congress भाजपसोबत काँग्रेसचं ‘सेटिंग ? आघाडी तोडल्यानं पवारांच्या राष्ट्रवादीची शंका

भाजपने ऐनवेळी अमोल बालवडकर यांना तिकीट नाकारले. त्यामुळे प्रचंड नाराज झालेल्या बालवडकर यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत पक्षाकडून सूस-बाणेर-पाषाण या प्रभाग क्रमांक ९ मधून (ड) अधिकृत उमेदवारीचा अर्ज भरला. राष्ट्रवादीने माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांना तिकीट नाकारून बालवडकर यांना संधी दिल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. बालवडकर यांच्याबरोबरच भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, अर्चना मुसळे, भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) डॉ.सिद्धार्थ धेंडे या माजी नगरसेवकांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

तुल्यबळ लढत होणार

राष्ट्रवादीने प्रकाश ढोरे व अर्चना मुसळे यांना औंध बोपोडी या प्रभाग क्रमांक ८ मधून उमेदवारी दिली आहे. तर, डॉ. धेंडे यांच्या पत्नी नंदिनी धेंडे यांना फुलेनगर-नागपूर चाळ या प्रभाग क्रमांक २ मधून पक्षाने उमेदवारी दिली आहे. भाजपच्याच बंडखोर उमेदवारांना प्रवेश देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून भाजपला तगडे आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्‍यता आहे.

आंदेकर कुटुंबीयांना राष्ट्रवादीची उमेदवारी

शहरातील गुंडगिरीविरुद्ध पोलिस आयुक्तांना खडे बोल सुनावणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मात्र शहरातील कुख्यात गुंडांच्या कुटुंबीयांना निवडणुकीसाठी तिकीट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातील लक्ष्मी आंदेकर व सोनाली आंदेकर या दोन्ही महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचे अर्ज वकिलांमार्फत दाखल करण्यात आले आहेत. गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांनाही पक्षाने उमेदवारी दिली आहे. याबरोबरच गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर यालाही राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता असून अजित पवारांवर टीका देखील होत आहे.

Ajit Pawar PMC Election 2025
Nagpur Congress : विधानसभेत बंडखोरी माजी नगरसेवकांना काँग्रेसचा धक्का; चौधरी, कापसे, सहारे, भुट्टो यांना डावलले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com