Ajit Pawar on CM Post : जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो, त्यांचं म्हणणं खरं ठरो ; असं अजितदादा का म्हणाले ; video पाहा

Ajit Pawar On Jayant Patil : अजित पवारांनी जयंत पाटलांना टोला हाणला.
Ajit Pawar On Jayant Patil
Ajit Pawar On Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar On Jayant Patil :'भावी मुख्यमंत्री' असे फलक सध्या राज्यात अनेक ठिकाणी दिसत आहे. बॅनरवरचे हे 'भावी मुख्यमंत्री'प्रत्यक्षात मुख्यमंत्री होणार का? यावर राज्यात चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार, असा दावा केल्याने महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे.

ठाकरे गट आणि काँग्रेसने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.जयंत पाटील यांनी केलेल्या या दाव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.

जयंत पाटलांच्या या दाव्यामुळे कोण मुख्यमंत्री होणार याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जयंत पाटलांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देत त्यांना टोला हाणला आहे

Ajit Pawar On Jayant Patil
Ajit Pawar News : 'सत्ता गेल्यामुळे ..'; अजित पवारांना कसली खंत वाटते ? म्हणाले..

आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार, असंही पाटील म्हणाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार, पण नक्की कोण? राष्ट्रवादीच्या वादाला मुख्यमंत्रीपदाची किनार आहे का? असे अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आहेत. अशातच जयंत पाटलांच्या विधानावर अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावेळी जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो, त्यांचं म्हणणं खरं ठरो, असं अजितदादांनी म्हटलं. सरकारला दहा महिने पूर्ण झालेत, पण जनतेच्या मनात या सरकारबद्दल समाधान असल्याचं दिसत नाही, असंही अजित पवार म्हणाले आहेत

Ajit Pawar On Jayant Patil
Pachora Bazar Samiti Election : पाचोऱ्यात ठाकरेंच्या सभेनंतरही शिवसेना आमदार किशोर पाटलांनी गड राखला

काय म्हणाले होते जयंत पाटील..

सध्या महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. समाधान याचे आहे की महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार आहे, असा दावा जयंत पाटील यांनी सातार्‍यात केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Ajit Pawar On Jayant Patil
Yawal Bazar Samiti Election : यावलमध्ये माजी खासदार जावळेंच्या सुपुत्राची सहकारात एन्ट्री ; एकहाती सत्ता

राष्ट्रवादीचा कोणता नेता भावी मुख्यमंत्री?

अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांचे 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख असलेले बॅनर त्यांचे समर्थक अधूनमधून लावत असतात, त्यामुळे राष्ट्रवादीचा कोणता नेता भावी मुख्यमंत्री होईल, असा प्रश्न जनता विचारत आहे.

नाना पटोले म्हणाले...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर म्हणाले, "जयंत पाटील यांनी कोणत्या समीकरणाच्या आधारे ही विधान केले आहे ते माहिती नाही. पण ज्याचे जास्त आमदार असतात त्याचाच मुख्यमंत्री होतो. त्यामुळे या विषयावर काही चर्चा करायची नाही,"

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com