अजित पवारांसमोर मास्क न घालता गेले की बड्या नेत्यांचीही चंपी झालीच म्हणून समजा!

कोरोना काळात मास्क न घालता गेलेल्यांना अजित पवारांनी (Ajit Pawar) शेलक्या शब्दांत सुनावले..
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama

पुणे : कोरोना काळात सर्वांवरच बंधने आलीत. मास्कमुळे तर वैताग आलाय. किती वेळ घालायचा, याला काही मोजमापच राहिलेले नाही. त्यामुळे अनेकदा मास्क खाली घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही. राज्यातील नेते तर सतत गर्दीत, व्यासपीठावर, बैठकांत असतात त्यांनाही मास्क काढायची गरज वाटू लागते. काहीजण तो काढतातही. टिव्हीवर मुलाखत देतानाही मास्क खाली घेतात. बैठकांमध्ये बसल्यावर मास्कशिवाय बोलतात. याला अपवाद एकच. तो म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा!

Ajit Pawar
`मास्क लावला नसेल तर मलाही बाहेर काढा`;पाहा व्हिडिओ

एखादा नियम ठरला म्हणजे त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे, असा अजित पवार यांचा कटाक्ष असतो. त्याला आपणही अपवाद असता कामा नये, असे अजितदादांनी ठरवले की ते तसेच वागतात. समोरचा आपल्यासमोरच असा नियम तोडत असेल तर त्याला तेथेच शेलक्या शब्दांत ठणकाविण्यास अजित पवार मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे अगदी ज्येष्ठ मंत्रीही अजित पवारांसमोर मास्क घालूनच जातात.

Ajit Pawar
महात्मा गांधींच्या आवडत्या प्रार्थनेचेही मोदी सरकारला वावडे

त्यांच्या मंत्रालयातील केबिनमध्ये कितीही मोठा नेता आला तरी तो काही फूट अंतरावरूनच बोलेल, अशी व्यवस्था केलेली आहे. तशी लाल रंगाची पट्टीच आखण्यात आली आहे. त्या पट्टीच्या पलीकडूनच सर्वांनी थांबायचे, अशी व्यवस्था केली आहे. त्याला कोणाची अपवाप नाही. खासदार सुप्रिया सुळे असोत की आमदार रोहित पवार यांनीही त्या पट्टीपलीकडूनच निवेदन द्यायचे, असे अनेक छायाचित्रांतून दिसते.

सार्वजनिक कार्यक्रमांतही अजित पवार हे पथ्य पाळतात. आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यावेळी सुनील शेळके यांना एक विनंती जाहीरपणे करावी लागली. दादा तुम्ही मास्क काढून बोलावे, अशी विनंती केल्यानंतरच दादांनी मास्क काढला पण त्या आधी त्या चुकीबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. पत्रकार परिषदांत कॅमेऱ्यासमोर बोलतानाही त्यांनी हे पथ्य पाळलेले आहे. कोणी पत्रकार मास्क काढून प्रश्न विचारत असेल तर त्यालाही ते तेथेच सुनावतात. अनेकदा माईकवर सॅनिटायझर फवारल्यानंतरच दाद त्यावर बोलतात. त्यामुळे पत्रकारांनाही अजित पवारांसमोर जाताना मास्क आहे की नाही, याची खात्री आधी करावी लागते.

Ajit Pawar
बाळासाहेब ठाकरेंची जयंती : उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मंत्र देणार?

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पुणे येथील कार्यालयाच्या उदघाटनाच्या वेळी गर्दी जमली होती. त्यावेळीही अजितदादांना दिलगिरी व्यक्त केली. तसेच राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांवर गर्दी जमवल्याबद्दल गुन्हाही दाखल झाला. तो गुन्हा दाखल करण्याचे अजित पवारांनी थांबविले नाही. या घटनेनंतर तर लोक अधिक काळजी घेऊ लागले. नेत्यांनीच नियम पाळले नाही तर जनता कसे ऐकेल, असे सांगत ते समोरच्या कार्य़कर्त्यांना किंवा नेत्यांना सुनावत असल्याचे अनेकांनी ऐकले असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com