अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावर स्पष्टीकरणं म्हणाले,..मी गंमतीनं म्हणालो...

Ajit Pawar : अजित पवारांनी 'त्या' विधानावर स्पष्टीकरणं दिल आहे.
Ajit Pawar Latest News
Ajit Pawar Latest NewsSarkarnama

पुणे : "आघाडी सरकारमध्ये आपल्याला गृहखातं हवं होतं, पण वरिष्ठांनी ते दिलं नाही," अशी खंत पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली होती. मात्र आपल्या या व्यक्तव्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

गृहखात्याबाबतचं आपलं ते विधान आपण गंमतीनं म्हणालो असल्याचे, पवारांनी आज (ता.२३ सप्टेंबर) स्पष्ट केले. (Ajit Pawar Latest News)

Ajit Pawar Latest News
अजितदादांच्या मनात चाललंय, तरी काय?

पुण्यातील राष्ट्रवादीच्या शहर कार्यकरणीच्या बैठकीत व्यासपीठावरील एका पदाधिकाऱ्याने अजितदादांना आपलं सरकार आले की तुम्ही गृहखातं घ्या, असे म्हटलं. त्यावर अजितदादांनी मिश्किलपणे म्हणाले होते की, "पाच वर्षापूर्वी मला उपमुख्यमंत्री केले तेव्हा मी वरिष्ठांना म्हटलं माझ्याकडे गृहखाते द्या, पण वरिष्ठांना वाटलं की यांच्याकडे गृहखाते दिले तर आपलं कोण ऐकणार? हे खर आहे की माझ्याकडे गृहखाते दिले तर मला जे योग्य वाटते तेच करणार," असे पवार म्हणाले होते. यावर आज त्यांनी स्पष्टीकरणं दिले आणि आपण केलेलं विधान गंमतीनं केल्याचे सांगितले.

Ajit Pawar Latest News
शिवसेनेकडून भाजपचा अचुक लक्ष्यभेद...माजी नगरसेविका पुनम धनगर शिवसेनेत!

पुढे बोलतांना पवारांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या व्हायरल फोटोवरही भाष्य केले, ते म्हणाले की, ते मुख्यमंत्र्यांचंच घर आहे. मंत्रालय असत तर वेगळी गोष्ट होती. पण ज्यांचे घर आहे तिथे त्यांनी काय करावं ती त्यांची इच्छा. पण यामुळे बेरोजगारी, महागाईचा प्रश्न बाजूला जातात. नेमकं खासदारांनी यावर बोलायला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी श्रीकांत शिंदेंनी सुनावले. तर अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या बारामती दौऱ्यावर बोलतांना ते म्हणाले की, या देशात कुणीही कुठेही जावे याबाबत सर्वाना संचार करण्याचा अधिकार आहे. मात्र माझ्यावर केलेले आरोप सर्व बिनबुडाचे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar Latest News
बारामतीच नव्हे, महाराष्ट्रातल्या सर्वच जागा आम्हाला जिंकायच्या आहेत...

दरम्यान, सगळीकडेच सर्वजण आपल्या जागा वाढाव्या म्हणून प्रयत्न करत असतात. टार्गेट महापालिका नाही, जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. लोकांनी कार्यकर्त्यांनी मदत केली. महापालिकेबाबत विचार करत बसू नका, तीन-चारचा प्रभाग झाला तरी लढायचं आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा केली असून स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. एकत्रित लढण्याबाबत जे होईल ते होईल. तो निर्णय वरिष्ठ नेते घेतील. मात्र आपण आता कामाला लागले पाहिजे, असा आदेशही पवारांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com