Ajit Pawar News : अजित पवारांचे शिंदे-फडणवीसांना पत्र; वेल्ह्याचे नामकरण राजगड करण्याची मागणी

स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ वर्षे राज्य कारभार चालवला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

पुणे : पुणे जिल्ह्यातील वेल्हे (Velhe) तालुक्याचं नामकरण राजगड (Rajgad) तालुका असं करावं, त्यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. त्याबाबतचे पत्र पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविले आहे. त्याद्वारे पवार यांनी ही मागणी केली आहे. (Ajit Pawar's letter to Shinde-Fadnavis; Demand to rename Velhe as Rajgad)

सरकारला लिहिलेल्या पत्रात अजित पवार यांनी म्हटले आहे की, स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ वर्षे राज्य कारभार चालवला आहे. त्यामुळे या किल्ल्याशी राज्यातील जनतेच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणूनच वेल्हे तालुक्याचं नामकरण हे राजगड असे करण्यात यावं, अशी जनतेची तीव्र इच्छा आहे. याबाबत तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींपैकी ५८ ग्रामपंचायतींनी नामकरणासाठी सकारात्मक ठराव दिला आहे. पुणे जिल्हा परिषदेनेही तसा ठराव केलेला आहे.

Ajit Pawar
Radhakrishna Vikhe : शिंदे गटाचा 'हा' नेता म्हणतो,राधाकृष्ण विखे माझ्या ह्दयात आणि त्यांनी मुख्यमंत्रीही व्हावं...

वेल्हे तालुका हा शिवकालीन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला तसेच स्वराज्यात महत्वाचे ठरलेले राजगड आणि तोरणा हे दोन किल्ले असलेला तालुका आहे. या तालुक्याचे जुने दस्तऐवज पाहता किल्ले तोरणाचे नाव प्रचंडगड या नावाने तालुक्याची ओळख होती. तथापि या तालुक्याचे मुख्य ठिकाण हे वेल्हे बुद्रूक, घेरा येथे असून तालुक्याचे नाव वेल्हे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar
Radhakrishna Vikhe : शिंदे गटाचा 'हा' नेता म्हणतो,राधाकृष्ण विखे माझ्या ह्दयात आणि त्यांनी मुख्यमंत्रीही व्हावं...

वेल्हे तालुक्यातील जनतेच्या भावना ह्या राजगड किल्ल्याशी जोडलेल्या आहेत. स्वराज्याची पहिली राजधानी वेल्हे तालुक्यात असून किल्ले राजगडावरून या तालुक्याचे नामकरण हे राजगड करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com