Pimpri-Chinchwad News : 'अजितदादांसह अनेकांनी माझा 'कार्यक्रम' केला, राष्ट्रवादीच्याच नेत्याची खंत

Pimpri-Chinchwad News : चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे या महिन्यात (ता.३) कर्करोगाच्या दिर्घ आजाराने निधन झाले.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे या महिन्यात (ता.३) कर्करोगाच्या दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वक्षीय सभा शनिवारी (ता.१४) झाली. त्यात जगताप तथा भाऊ यांच्या अनेक आठवणी त्यांच्या राजकीय विरोधकांनीही जागवल्या.

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Srirang Barne) यांनी यावेळी भाऊंशी असलेले दहा वर्षाचे कट्टर राजकीय वैर कसे संपवले ते सांगितले. तर, राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर (Bhausaheb Bhoir) यांनी, तर भाऊंशी तब्बल वीस वर्षे आपले दिलदार राजकीय वैमनस्य कसे होते, याचे अनेक किस्से ऐकवले. फर्डे वक्ते असलेल्या भोईरांनी जोरदार फटकेबाजी केल्याने गंभीर वातावरण काहीकाळ हलके झाले. सर्वाधिक काळ भाऊंचा विरोधक असल्याने जास्त वेळ बोलणार असे सुरुवातीसच त्यांनी सांगून टाकले.

Ajit Pawar News
Satyajit Tambe News : एका विधान परिषदेसाठी भाजपवर नामुष्की; मोदींच्या फोटोला काळे फासलेल्या तांबेंना पाठिंबा?

भाऊंचे मंत्रीपदाचे स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. त्यांच्या रुपाने शहराचाही मंत्रीपदाचा बॅकलॉग राहिला. व्यासपीठावरील भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्याकडे पाहत आता तुम्ही भाऊंचे ते स्वप्न पूर्ण करा, असे भोईर म्हणताच त्याला उपस्थितांनीही प्रतिसाद दिला. दरवर्षीच्या शहरातील सर्वपक्षीयांच्या दिवाळी फराळ उपक्रमात भाऊ, तुम्ही मंत्री व्हा आणि शहराचं स्वप्न पूर्ण करा, असे आपण लक्ष्मणभाऊंना म्हटलो होतो, या आठवणीला त्यांनी यावेळी पुन्हा उजाळा दिला.

निर्भीड व स्पष्टवक्ते भोईरांनी यावेळी आपले नेते व पक्षालाही घरचा आहेर दिला. पालिका ते आमदारकीच्या निवडणुकीपर्यंत अजितदादांसह अनेकांनी माझा कार्यक्रम केला, असे ते म्हणताच सभेत हास्याची लकेर उमटली. गंभीर वातावरण काहीसे हलके झाले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत नेत्यांनीच आपला पराभव केला, अजितदादांनी (Ajit Pawar) कार्यक्रम केला, असे ते म्हणताच पुन्हा हलका हशा झाला. आपल्याला नेत्यांचा आधार मिळाला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

अजितदादांना सकाळी सकाळीच भेटायला लागते, असे सांगत त्यांनी अजितदादांच्या सकाळीच सुरु होणाऱ्या दिनक्रमावर सकारात्मक टिपण्णी केली. भाऊ हे जबर महत्वाकांक्षी, दृढ आत्मविश्वास, स्वाभिमानी नेते होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी होतील, किती मते घेतील, याचा भाऊंना सांगितलेला आडाखा बरोबर निघाल्याने विजयानंतर ते घरी न जाता पहिले मला भेटायला आले होते, ही आठवण सांगताना ते सद्गगित झाले.

Ajit Pawar News
Nana Patole News : सत्यजीत तांबेंची खेळी फसली? काँग्रेसने नाशिक पदवीधरसाठी जाहीर केला उमेदवार

राजकारण करा, पण टोकाची भूमिका घेऊ नका. कटूता ठेवा, पण मने दुषित ठेवू नका, असा अनुभवी सल्ला त्यांनी भाऊंबरोबरच्या आपल्या वीस वर्षाच्या दिलदार वैमनस्याचा दाखल देत सध्याच्या राजकीय नेत्यांना दिला. वीस वर्षांनंतरही भाऊ आपले शत्रू झाले नाहीत, असे ते म्हणताच वातावरण पुन्हा काहीसे गंभीर झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com