अमित शाहंचा बहुचर्चित पुणे-नगर दौरा तात्पुरता स्थगित

केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शाह येत्या २६ नोव्हेंबरला पुणे तर २७ ला नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते.
अमित शाह
अमित शाहसरकारनामा
Published on
Updated on

पुणे : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांचा येत्या २६ व २७ नोव्हेंबरचा पुणे व नगर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.नवीन तारीख आणि कार्यक्रमांचा तपशील लवकरच कळविला जाईल, असे भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जाहीर केले आहे.

अमित शाह
कॉंग्रेसचा महाविकास आघाडी सरकारला `आहेर`: पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा...

सहकार मंत्री म्हणून काम सुरू केल्यानंतर केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शाह येत्या २६ नोव्हेंबरला पुणे तर २७ ला नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. सहकारची पंढरी मानल्या जाणाऱ्या प्रवरानगर येथील विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या स्मृती स्थळाला भेट होते. विखे-पाटील यांनी आयोजित केलेली सहकार परिषद व शेतकरी मेळाव्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते.

अमित शाह
एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी; अन् आदित्य ठाकरेंची जनतेच्या पैशावर स्कॉटलंड वारी

विठ्ठलराव विखे-पाटील यांनी राज्यातला पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे सुरू केला.त्यामुळे त्यांना सहकारी साखर कारखानदारीचे जनक मानले जाते.सहकार मंत्री झाल्यानंतर शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर पुण्याबरोबरच प्रवरानगरला भेट देणार होते.२६ नोव्हेंबरला पुण्यातला दौरा आटोपून २७ ला सकाळी प्रवरानगरला जाणार होते.पुण्यात वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी संस्थेला भेट देणार होते.

२६ नोव्हेंबरला संविधान दिवस आहे. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा मुहूर्त या दिवशी साधण्यात आला होता. हा पुतळा महापालिकेत उभारण्यासाठी ‘आरपीआय’ने पुढाकार घेतला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले या कार्यक्रमला उपस्थित राहणार होते.त्याचवेळी महापालिकेच्या हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमीपूजन शाह यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले होते.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com