ॲमिनिटी स्पेस : कॉंग्रेस-राष्ट्रवादीने लाटलेल्या जागांची यादी चंद्रकांत पाटील विसरले की काय ?

पाटील यांनी घोषणा केल्यानंतर अशी यादी पाटील यांनी जाहीर करावीच, असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिले होते.
Chandrakant Patil
Chandrakant Patilsarkarnama
Published on
Updated on

पुणे : ॲमिनिटी स्पेसवरून पुण्यात विरोधक राजकारण करीत आहेत, अशी टीका करीत दोन दिवसात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या पुण्यातील लोकप्रतिनिधींनी ॲमिनिटीच्या किती जागा लाटल्या हे जाहीर करू, अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आठ दिवसांपूर्वी पुण्यात केली होती.मात्र, आठ दिवसांनंतरदेखील पाटील यांनी यादी का जाहीर केली नाही. जगांचा विषय चंद्रकांत पाटील विसरले की काय असा प्रश्‍न विचारण्यात येऊ लागला आहे.

पाटील यांनी घोषणा केल्यानंतर अशी यादी पाटील यांनी जाहीर करावीच, असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिले होते. या पाश्‍र्वभमीवर विरोधकांकडून त्या यादीची आठवण पाटील यांना करून देण्यात आली आहे.

Chandrakant Patil
परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी चंद्रकांतदादांनी उपचार सुरू करावेत

तीन्ही पक्षांच्या नेत्यांनी लाटलेल्या जागा ताब्यात घेऊन आतापर्यंतची भाड्याच्या रकमेची वसुलीदेखील करण्यात येणार असल्याने पाटील यांनी त्यावेळी सांगितले होते.ॲमिनिटी स्पेसच्या नावाखाली जागा मोकळ्या ठेऊन त्यावर झोपड्या उभारण्याचा व त्यावर पुन्हा ‘एसआरए’ उभारण्याचा डाव असतो.मुळात या जागा सार्वजनिक वापरासाठी आहेत. मात्र, त्याचा दुरूपयोग केला जात आहे.कॉंग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना यावरून राजकारण करीत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला होता.

Chandrakant Patil
कुणी किती जागा बळकावल्या दाखवाच;राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान

बांधकाम करण्यात येणाऱ्या भूखंडाच्या १५ टक्के असणारी ही जागा स्थानिक स्वराज्य संस्थांना ॲमिनिटीच्या स्वरूपात देण्यात येते. या जागावेर मैदाने, रूग्णालये, शाळा, समाजमंदिर, यासह सार्वजनिक वापराच्या सुविधा या जागांवर निर्माण करण्यात येतात.चांगल्या भूमिकेतून निर्माण करण्यात आलेल्या तरतुदीचा काहीजण चुकीचा वापर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पुण्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या काही लोकप्रतिनिधींनी गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकारे जागा बळकावल्या आहेत.या जागा संबंधितांकडून काढून घेतल्या जातील तसेच या जागांचे थकलेले भाडे वसूल करण्यात येईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यावर पुढे काहीच झाले नाही. पाटील यांच्या केवळ घोषणाच झाल्या. पुढे काही होत नाही अशी टीका करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com