Bharat Gaikwad News update
Bharat Gaikwad News update Sarkarnama

Pune Crime : ACP गायकवाड यांनी पत्नी-पुतण्याला घातल्या गोळ्या; स्वत:वरही गोळी झाडली..

ACP Bharat Gaikwad News: पुण्यातील बाणेर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
Published on

Pune ACP News: पुण्यात सहाय्यक पोलिस आयुक्तांनी (ACP) पत्नी-पुतण्याला गोळ्या घालून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

अमरावती पोलिस दलातील (Amravati Police) सहाय्यक पोलिस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. त्यानंतर त्यांनी स्वत:ही आत्महत्या केली.

Bharat Gaikwad News update
Pimpri Chinchwad News : भाजपच्या आरोग्य शिबिरात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या डॉक्टर,कर्मचाऱ्यांकडून तपासणी

मोनी गायकवाड Moni Bharat Gaikwad (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावे आहेत. पुण्यातील बाणेर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेने खळबळ उडाली आहे.या घटनेचे कारण अद्याप समोर आले नसून चतु:शृंगी पोलीस (Chathushringi Police Station) घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे.

Bharat Gaikwad News update
Rajasthan Assembly elections 2024 : मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर न करता भाजप-काँग्रेस रिंगणात

गायकवाड हे अमरावती येथे नेमणुकीस असल्याने सुट्टीच्या दिवशी पुण्यात येत होते. पती-पत्नी पुतण्या आणि दोन मुले असा परिवार बाणेर परिसरात वास्तव्यास होता.

गायकवाड हे शनिवारी रात्री ते पुण्यात आले होते. त्यानंतर रविवारी (ता. २३) राहत्या घरी त्यांनी पत्नी आणि पुतण्याचा गोळ्या झाडून खून केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com