ओशो आश्रमात ८१ वर्षीय साधकाकडून ५३ वर्षीय महिलेचा विनयभंग

Molest| Pune| OSHO Ashram देशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक संन्यासी या आश्रमात ध्यानसाधनेसाठी येत असतात.
OSHO Ashram
OSHO Ashram
Published on
Updated on

पुणे : पुणे शहरात अलीकडे महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील ओशो आश्रमातून (OSHO Ashram) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ओशो आश्रमात ध्यानधारनेसाठी आलेल्या ५३ वर्षीय संन्यासी महिलेचा ८१ वर्षांच्या साधकाने विनयभंग (molestation) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी 81 वर्षीय योग प्रताप उर्फ लाल प्रताप यांच्यावर गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. पोलीस उपनिरीक्षक इंगोले या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Pune latest Crime news)

OSHO Ashram
नगर अर्बन बॅंकेच्या दीडशे कोटींच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुण्यातील ओशो आश्रम हे देशभरातील प्रसिद्ध आश्रम आहे. देशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक संन्यासी या आश्रमात ध्यानसाधनेसाठी येत असतात. असं असताना आश्रमातील या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाणेर परिसरातील रहिवासी असेलेली पीडित महिला गेल्या पंचवीश वर्षापासून नियमितपणे ओशोच्या आश्रमात ध्यानसाधना करण्यासाठी येत असते. 1996 पासून त्या ओशो आश्रमात ध्यानधारणेसाठी येतात.

दरम्यान, 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्या नेहमीप्रमाणे आश्रमात ध्यानसाधना करण्यासाठी गेल्या असताना एका 81 वर्षीय साधकाने त्यांचा विनयभंग केला. संशयित आरोपी साधक योग प्रतापने फिर्यादीला हातवारे करत आपल्याजवळ बोलावलं. त्याने संन्यासी महिलेला त्यांच्या गळ्यातील ओशो यांचा फोटो असलेली संन्यासी माळ काढून ठेवण्यास सांगितली. त्यानंतर 'गेट आऊट' असं मोठ्याने ओरडत त्यांचा विनयभंग केला आहे. या घटनेनंतर पीडित महिलेनं कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात योग प्रताप उर्फ लाल प्रताप विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. 81 वर्षीय योग प्रताप उर्फ लाल प्रताप हा ओशो आश्रमाच्या विश्वस्त सदस्यांपैकी एक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com