पुणे : दोन वर्षांनतर उत्सव साजरा होत असल्याने अनेक ठिकाणी बाप्पाच्या भव्य मिरवणुका काढण्यात येत आहेत. त्यामुळे गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांकडून करडी नजर ठेवण्यात आली आहे. राज्यात जवळपास 70 हजार सार्वजनिक गणेश मंडळांचे विसर्जन होणार आहे.
विरोधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar)यांनी आज पुण्यातील पहिला मानाचा गणपती कसबा गणपती, मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मित्र मंडळ, मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मित्र मंडळ, मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ व काही सार्वजनिक मंडळाचे दर्शन घेतले व आरती केली. चंद्रकांत पाटील हे अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला गेले आहेत.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज पुण्यात आहे. अनेक मानांच्या गणपतीचे त्यांनी दर्शन घेतले. भाजप नेते चंद्रकांत पाटीलदेखील आज पुण्यात असून तेदेखील मानाच्या गणपतींचे दर्शन घेत आहेत.
कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार, तेव्हाच आदित्य ठाकरे तिथे पोहोचले. यावेळी चंद्रकांत पाटीलही तिथेच उपस्थित होते. आदित्य ठाकरे गर्दीतून मार्ग काढत चंद्रकांत पाटील यांना भेटण्यासाठी गेले तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी त्यांना आधी दर्शन घेऊन येण्यास सांगितले. एवढेच नव्हे तर आदित्य ठाकरेंना यावेळी आरतीचा मानही देण्यात आला. त्यानंतर पालखी मिरवणुकीत दोन्ही नेते एकत्र सहभागी झाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.