राज्यपाल कोश्यारींची भाजप प्रवक्तेपदी नेमणूक करा; शिवसैनिकांनी केली मागणी

Sanjay Raut|Shivsena : मावळ तालुका शिवसेनेने राज्यपालांना कोल्हापूरी जोडा काल पाठवला आहे.
Pimpri Shivsena Latest News
Pimpri Shivsena Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : मुंबईतून गुजराती आणि मारवाडी गेले,तर ती देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही,तिथे पैसा राहणार नाही,असे महाराष्ट्र व मराठी माणसाचा अपमान करणारे आक्षेपार्ह वक्तव्य नुकतेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईतच करण्याचे धाडस केले. त्यामुळे त्यांचा राज्यभर निषेध सुरु झाला असून त्यांना परत बोलावण्याची मागणी करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडसह मावळातही राज्यपालांविरोधात शिवसेनेने (Shivsena) निषेध आंदोलन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) ते उद्या करणार आहे. तर, कॉंग्रेस, मात्र शांतच आहे. (Pimpri Shivsena Latest News)

Pimpri Shivsena Latest News
ईडीनं ताब्यात घेतल्यावर संजय राऊतांच्या आईला अश्रू अनावर

राज्यपालांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्यांच्याविरुद्ध शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकारपरिषद घेत कोश्यारींना कोल्हापूरी जोडा दाखविण्याची गरज असल्याचे सांगितले होते. त्यावर लगेचच मावळ तालुका शिवसेनेने राज्यपालांना कोल्हापूरी जोडा काल पाठवला. तत्पूर्वी मावळ तालुका शिवसेनेने माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांच्या नेतृत्वात वडगाव मावळ पंचायत समिती कार्यालयासमोर राज्यपालांच्या निषेधार्थ आंदोलन केले. नंतर मराठी माणसाच्या भावना राज्यपालांनी दुखावल्याबद्दल त्यांचा निषेध करणारे निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिले.

Pimpri Shivsena Latest News
हा तर संसदीय लोकशाहीचा 'ईडी'घात!

पिंपरी-चिंचवड शिवसेनेने आज सायंकाळी पिंपरीत राज्यपालांच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी राज्यपालांचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या गेल्या. त्यांना केंद्र सरकारने परत बोलावण्याची मागणी करण्यात आली. भाजपने त्यांना प्रवक्तेपदी नेमावे असा टोलाही यावेळी लगावण्यात आला. त्यांच्या तोंडून भाजपचे नेतेच बोलत आहेत, असे शिवसेना शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले म्हणाले. राज्यपाल हे भाजपचे प्रवक्ते असल्यासारखी वक्तव्ये करत असून त्यांनी पदाची लायकी घालवली आहे, असा हल्लाबोल महिला शहरप्रमुख ॲड. उर्मिला काळभोर यांनी यावेळी केला.

या आंदोलनाकडे पक्षाचे प्रमुख स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. अॅड. भोसले वगळता पक्षाचे इतर सर्व आठ माजी नगरसेवक या आंदोलनाला हजर नव्हते. पक्षातील बंडात सामील झालेले शहराचे आजी, माजी खासदार (श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील) यांच्या निषेधार्थ शहर शिवसेनेने याअगोदर केलेल्या आंदोलनातही हे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱी सामील झाले नव्हते. त्यामुळे शहर शिवसेनेत सारे काही आलबेल नाही, असा संदेश गेला आहे. तसेच ही मंडळी शहरप्रमुखांविषयी नाराज असल्याची चर्चा त्यातून सुरु झाली आहे.

Pimpri Shivsena Latest News
खासदार संजय राऊतांवरील कारवाईचे मूळ ‘म्हाडा’ने केलेल्या ‘त्या’ तक्रारीत

दरम्यान, राज्यपालांनी तमाम मराठी माणसच्या विरोधात गलथान वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि वाहतूक महासंघ उद्या (ता.१ऑगस्ट) शहरात निषेध आंदोलन करणार आहे. त्यात प्रमुख नेते,आजी, माजी आमदार, माजी नगरसेवक आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज (ता.३१ जुलै) सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com