‘लॉकडाऊन’च्या नावाखाली राज्य सरकारने अडवल्या तब्बल ४२९ नियुक्त्या

लॉकडाऊनमुळे थांबलेली नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागांना द्यावेत अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
MPSC
MPSCSarkarnama
Published on
Updated on

आकाश देशमुख : सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्य सरकारचा स्पर्धा परीक्षांच्या नियुक्त्यांचा गोंधळ काही कमी होताना दिसत नाही.२०१९ या वर्षात ‘एमपीएससी’ आणि सरळसेवा परीक्षांच्या लागलेल्या निकालातून विविध परीक्षांच्या तब्बल ४२९ नियुक्त्या दिल्या गेल्या नसल्याचे चित्र तपासणीतून समोर आले आहे. एकीकडे आरोग्य भरतीच्या परीक्षेच्या नियोजनाबाबत गोंधळ सुरू असतानाच नियुक्त्यांचा घोळदेखील समोर आला आहे.

MPSC
आमदार सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्यांचे काय ?

कोरोनाचा देशभरात प्रादुर्भाव सुरू होण्याआगोदर २०१९ या वर्षात विविध पदांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले होते. त्यानंतर नियुक्त्यांची प्रक्रिया सूर असतानाच मार्च २०२० पासून देशभरात टाळेबंदी घोषित करण्यात आली. त्यामुळे सुरू असलेल्या नियुक्तीप्रक्रियेत खंड पडला. लॉकडाऊन होण्यापूर्वी नियुक्ती मिळालेले उमेदवार कामावर रुजू देखील झाले, मात्र, लॉकडाऊनमूळे नियुक्त्या थांबलेल्या उमेदवारांवर आता बेरोजगारीची वेळ आली आहे. परीक्षा पास होऊनही समाजात बेरोजगार म्हणून वावरावे लागत असल्याने प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रासाला या विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे.

MPSC
रामदास आठवले म्हणाले; पुण्याच्या महापौरपदाचा फडणविसांनी शब्द दिलाय

या आहेत प्रलंबित नियुक्त्या

१. सहायक मोटार वाहन निरीक्षक: ४७

२. सयुंक्त गट क परीक्षा लिपिक टंकलेखक: १५२

३. लेखा व कोषागार भरती: १३२

४. ग्रंथपाल आदिवासी विभाग ठाणे: ०४

५. कृषी सेवक भरती लातूर: ९४

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर रेंगाळलेली नियुक्तीप्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आश्वासन राज्य सरकार कडून देण्यात आले; मात्र घोषणेपलीकडे वास्तवात काहीच हालचाल झाली नसल्याचे दिसत आहे. नियुक्तीप्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी संबंधित विभागांना पत्राद्वारे, निवेदनाद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून करून सुद्धा काहीच हालचाल होत नसल्याने विद्यार्थी पुरते हावालदिल झाले आहेत. लॉकडाऊन आला त्यात आमचा काय दोष ? असा उद्विग्न सवाल आता ते करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीने बैठक घेऊन लॉकडाऊनमुळे थांबलेली नियुक्तीप्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागांना द्यावेत अशी मागणी प्रलंबित उमेदवारांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com