पुणे : पुणे जिल्हा बॅंकेच्या (PDCC Bank Election) तिसऱ्या जागेचा निकाल हाती आला असून यात शिरुर तालुका अ वर्ग मतदार संघातून आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी एकहाती विजय मिळवला आहे. या निमित्ताने आता आमदार-संचालक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत अशोक पवार हे सातवे आमदार ठरले आहेत. पवारांना १३१ पैकी १०९ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधातील आबासाहेब गव्हाणे यांना २१ मते पडली. १ मत बाद झाल्याने निकाल १०९ : २१ असा जाहीर झाला आणि पुणे बॅंकेत आमदार अशोक पवार यांनी प्रवेश मिळविला.
आमदार अशोक पवार विरोधात सर्वपक्षीय पदाधिकारी अशी ही निवडणूक रंगली होती. सुरुवातीला संचालकपदाची हॅट्रिक केलेले जेष्ठ संचालक निवृत्तीआण्णा गवारेंनी (Niruttianna Gaware) पवारांसाठी माघार घेतली. त्यानंतर निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेसचे एकेकाळचे तालुकाध्यक्ष आबासाहेब गव्हाणे यांनी आपला अर्ज कायम ठेवत थेट पवार यांना आव्हान दिले होते. त्यांच्या आव्हानाला भाजपाचे माजी आमदार बाबुराव पाचर्णेंसह अनेकांनी थेटपणे तर काहींनी छुपा पाठींबा दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत चमत्कार करण्याची भाषाही गव्हाणे समर्थकांकडून केली गेली होती.
या सगळ्या घडामोडींमुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे असतानाच आजच्या मतमोजणीत आमदार अशोक पवार यांना १३१ पैकी १०९ मते तर आबासाहेब गव्हाणे यांना २१ मते पडली. एक मत बाद झाल्याने निकाल १०९ : २१ असा जाहीर झाला आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत आमदार-संचालक म्हणून सातवे संचालक म्हणून आमदार अशोक पवार यांनी प्रवेश मिळविला.
असे आहेत आमदार अशोक पवार सातवे आमदार-संचालक..!
दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), अजित पवार (बारामती), दत्तामामा भरणे (इंदापूर), संजय जगताप (पुरंदर), दिलीप मोहिते (खेड), संग्राम थोपटे (भोर) व सातवे आमदार अशोक पवार (शिरुर-हवेली) अशी आमदार-संचालक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील आमदार-संचालकांची यादी असून बिनविरोध होता-होता झालेल्या या निवडणूकीत शिरुरकरांनी पूर्णपणे अशोक पवारांनाच साथ दिल्याचे या निवडणूकीने निष्पन्न झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.