Ajit Pawar : सुनील टिंगरेंची उमेदवारी कापणार? अजितदादांनी सांगितले, 'जाणीवपूर्वक ...'

Assembly election 2024 Ajit Pawar Sunil Tingre : राज्यातली कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याकरता मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री प्रयत्न करतो आहोत, असे देखील अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar- Sunil Tingre
Ajit Pawar- Sunil Tingresarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : वडगाव शेरीमध्ये काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली होती. या सभेत पोर्शकार अपघाताचा उल्लेख करत सुनील टिंगरेंना इशारा दिला होता. त्यामुळे टिंगेंची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार बदलणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र,अजित पवारांनी सुनील टिंगेंच्या मागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे.

अजित पवार म्हणाले, मधल्या काळात आमदार सुनील टिंगरेंचा एका प्रकरणाशी संबंध नसताना त्याना जाणीवपूर्वक बदनाम करण्यात आले. त्याचे मतदारसंघातील काम कौतुक करण्यासारखे आहे. अजित पवारांनी पोर्शकार प्रकरणाचा उल्लेख न करता आमदार सुनील टिंगरे यांच्यासोबत असल्याची स्पष्ट केले.

Ajit Pawar- Sunil Tingre
Ambadas Danve News : `लाडकी बहीण` कार्यक्रमाला प्रत्येकी पन्नास महिला आणण्याचे टार्गेट ; दानवेंचा पुराव्यासह आरोप

सुनील टिंगरे यांच्या मतदारसंघातली विविध विकास कामांचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पवार म्हणाले, वडगाव शेरीतील विकासकामांसाठी यापूर्वी मी निधी दिला आहे. 15 कोटी रुपये खर्चून साडेसात एकरातील राजमाता जिजाऊ उद्यान साकारले आहे. या उद्यानाच्या उर्वरित कामासाठी नऊ कोटी रुपयाचा निधी या मी मंजूर करणार आहे.महायुतीच्या उमेदवाराला मतदान केले तर पुढच्या पाच वर्षात पाच हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन अजित पवारांनी दिले.

राज्यात घडत असलेल्या लैंगित शोषणाच्या घटनांच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. राज्यातली कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याकरता मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री प्रयत्न करतो आहोत. लैंगिक शोषणाच्या घटना घडू नयेत याकरता आम्ही राज्यातील सर्व पोलिस आयुक्तांशी संवाद साधला आणि अशा घटना घडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या, असल्याचे अजित पवार म्हणाले.

मी शब्दाचा पक्का

सरकारने लाडकी बहीण योजना आणली. आपण आपल्या शब्दाचे पक्के आहोत. मी सांगतो तसं वागतो. ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे भाऊबीज म्हणून ऑक्टोबरच्या दहा तारखेपर्यंत लाडक्या बहिणांना देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com