MP Amol Kolhe Vs ShivSenaUBT : खासदार कोल्हेंवर शिवसेना'UBT'मधील पदाधिकारी भडकलेत, कारण...

In Shirur LokSabha Constituency of MP Amol Kolhe officials are upset as ShivSenaUBT did not get a single seat in the Legislative Assembly : 'NCP'शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेना'UBT'ला विधानसभेला एकही जागा न मिळाल्याने शिवसेना पदाधिकारी नाराज आहेत.
MP Amol Kolhe 1
MP Amol Kolhe 1Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाविकास आघाडीमध्ये सर्व काही अलबेल आहे, असे नाही. कुठे ना कुठे, तरी धुसफूस सुरू आहे. जसे उमेदवार जाहीर होते, तसे नाराजीनाट्य वाढतच आहेत.

पुण्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात, देखील महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात एकही जागा मिळू न दिल्यावरून खासदार अमोल कोल्हे यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पदाधिकारी चांगलेच भडाकले आहेत.

शिवसेना'UBT'चे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड म्हणाले, "शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेला (Shiv Sena) विधानसभा निवडणुकीसाठी एकही जागा खासदार अमोल कोल्हे यांनी मिळू दिलेली नाही. तोंडावर एक बोलायचे अन् मागे दुसरेच राजकारण करायचे, अशी कोल्हे यांची दुटप्पी भूमिका आहे" स्वतःची निवडणुकीचे इप्सित साध्य झाल्यावर ते आता शिवसेनेला विचारत नाहीत. शिवसेना संपविण्याचा प्रयत्न खासदार कोल्हे करत आहेत, असा गंभीर आरोप खांडेभराड यांनी केला.

MP Amol Kolhe 1
Sujay Vikhe : 'मला मारण्याचा पूर्वनियोजित कट'; संगमनेरमधील हिंसाचारावर माजी खासदार विखेंचा गंभीर आरोप

जिल्हाप्रमुख खांडेभराड यांनी अमोल कोल्हे यांना लोकसभा निवडणुकीची (Elaction) आठवण करून दिली. "कोल्हे यांच्या मागे लोकसभा निवडणुकीत कार्यकर्ते नव्हते, तेव्हा शिवसैनिकांनी त्यांच्यासाठी रक्ताचे पाणी केले. घराघरात, माणसामाणसांपर्यंत गेले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना अंगावर घेतले. पण निवडून गेल्यापासून कोल्हे यांनी आम्हाला साधा एक फोन केलेला नाही. आता विधानसभेच्या जागा वाटपात त्यांनी आघाडीतल्या सर्व पक्षांना समान न्याय देण्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती. खरेतर शिरूर लोकसभा मतदारसंघ अनेक वर्षे शिवसेनेकडे होता. आमची येथे ताकद आहे. म्हणून आम्हाला दोन जागा मिळाल्या पाहिजेत", असे खांडेभराड यांनी म्हटले.

MP Amol Kolhe 1
Indapur Vidhan Sabha Election 2024 : 'दलबदलू' चा 'अद्श्य हात', कसा विश्वास ठेवायचा? आम्ही त्यांना राज्यपाल करणार होतो! पण...

तर खेडचा आमदार शिवसेनेचाच : रामदास धनवटे

"महाविकास आघाडीने आमचा विचार केला नाही, तर योग्य निर्णय घेऊ. खेडच्या जागेवर शिवसेनेचाच अधिकार होता. शेवटी इथल्या शिवसैनिकाला जे मान्य असेल, त्याबरोबर आम्हाला राहावे लागेल. काहीही झाले तरी खेडमधून शिवसेनेचाच आमदार होईल", असे खेडचे तालुकाप्रमुख रामदास धनवटे यांनी म्हणत, बंडखोरीचे निशाण फडकवण्याचा इशारा दिला.

जुन्नर शिवसेनेचा आज निर्धार मेळावा

खेड आणि जुन्नरसाठी आग्रही असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जुन्नर मध्ये रविवारी (ता.27) निर्धार मेळाव्याचे आयोजन केले असून, पहिला भगवा शिवनेरीवर मग विधानसभेवर अशी हाक देत, जोरदार तयारी केली आहे. या मेळाव्याला जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, सुरेश भोर यांच्यासह सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com