रामदास आठवले हे समाजाला नको असलेले नेते : आनंदराज आंबेडकर

रामदास आठवले हे समाजाला नको असलेले नेते : आनंदराज आंबेडकर

पुणे : कोरेगाव भीमा येथील दंगलीनंतर राज्यभरात पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परंतु, त्यानंतर ऐक्‍याची चर्चा ही व्यर्थ आहे. मुळात "रिपब्लिकन ऐक्‍य' हा संपलेला विषय आहे. सध्या काही रिपब्लिकन नेत्यांचे फक्त धड असून त्यांचे डोके भलत्याच लोकांचे आहे. जनाधार संपल्यामुळे रामदास आठवले ऐक्‍याची साद घालत आहेत. परंतु, ते समाजाला नको असलेले नेते असल्याची टीका रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली. 

वढू बुद्रूक, कोरेगाव भीमा आणि सणसवाडी येथे त्यांनी ग्रामस्थांची भेट घेतली. तसेच वढू येथील गोविंद गायकवाड यांच्या समाधीसह कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला भेट दिली. यावेळी पोलिस अधीक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त अधीक्षक संदीप पखाले यांची भेट घेऊन तपासाची माहिती घेतली. यासंदर्भात त्यांनी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. 

आंबेडकर म्हणाले,"" सत्तेत असलेले आठवले यांचा जनाधार संपला असून ऐक्‍याचे नाटक पुन्हा त्यांनी सुरू केले आहे. त्यामुळेच औंरगाबाद येथील त्यांची जाहीर सभा आंबेडकरी जनतेने उधळून लावली. दरम्यान, कोरेगाव भीमा येथे दंगल होणार असल्याचे राज्यसरकारची गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरल्यामुळे हा प्रकार घडला. वढू येथील घटनेनंतर पोलिस प्रशासनाने फौजफाटा तैनात करणे गरजेचे होते. परंतु, खऱ्या दंगेखोरांना अटक करण्याऐवजी या प्रकरणात नक्षलवादी संबंध जोडून शासन मूळ आरोपींवरील लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत अाहे.

या दंगलीमागे असलेल्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करावी. तसेच संबंधित व्यक्ती व संघटनांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत. राज्यसरकारची या प्रकरणातील भूमिका संशयास्पद असून भिडे आणि एकबोटेंना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला 200 वर्षपूर्ती सोहळ्याला विरोध म्हणून स्थानिक गावासह अन्य गावांनी "काळा दिवस' पाळून गावबंद ठेवले. त्यामुळे भविष्यात विजयस्तंभाला धोका असल्यामुळे त्याठिकाणी कायमस्वरूपी पोलिस चौकी उभारून संरक्षण द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत. तसेच राज्यभरातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी देखील मागणी करणार असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com