Atul Benke On Maratha Arakshan : मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे पहिले आमदार अतुल बेनके ठरणार ?

Atul Benke On Marath Arakshan : "जुन्नरच्या उपोषणास बसलेल्या समाज बांधवांची आज भेट घेणार.."
Atul Benke On Marath Arakshan
Atul Benke On Marath ArakshanSarkarnama
Published on
Updated on

Atul Benke On Maratha Arakshan : आरक्षणासाठी मराठा समाजाने सुरु केलेले आंदोलन आता तीव्र झाले आहे. उपोषणाच्या जागी नेत्यांना गावबंदी आणि ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व स्थानिक सदस्यांच्या राजीनाम्याने घेतली आहे. आता हे लोण आमदारकीपर्यंत पोहोचण्याचे संकेत आता मिळाले आहेत. कारण शिवजन्मभूमी जु्न्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके यांनी त्यासाठी आता राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. (Latest Marathi News)

Atul Benke On Marath Arakshan
Sharad Pawar News : राष्ट्रवादीकडून अतुल बेनके जुन्नर विधानसभा लढविणार का? शरद पवार म्हणाले...

आरक्षणासाठी समाजाच्या आमदारांनी राजीनामे द्यावेत, या मराठा समाजाच्या मागणीवर बोलताना समाज म्हणेल तशी पुढे वाटचाल करण्याची भूमिका राहील, त्यांची आग्रही भूमिका असेल, तर राजीनामा देण्यास तयार आहे, असे आमदार बेनके म्हणाले. त्यासाठी विविध मराठा संघटनांशी येत्या आठ दिवसांत चर्चा करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जु्न्नरला उपोषणास बसलेल्या समाज बांधवांची आज भेट घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.

माझ्या राजीनाम्याने हा प्रश्न सुटणार असेल, तर लगेच तो द्यायला मी तयार आहे, असे ते 'सरकारनामा'शी बोलताना प्रतिक्रिया दिला. याप्रश्नी राज्य विधीमंडळाचे दोन-तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या मागे रेटा लावण्यासाठी याबाबत राज्यातील समाजाच्या इतर आमदारांनीही खास अधिवेशनाची मागणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे इतर मराठा आमदार काय भूमिका घेतात? याकडे आता समाजाचे लक्ष लागले आहे.

Atul Benke On Marath Arakshan
NCP Replied PM Modi : कृषिमंत्री असताना शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले ? मोदींच्या टीकेला राष्ट्रवादीने यादीच दिली

दरम्यान आमदार बेनकेंनी राजीनामा द्यावा, समाज त्यांच्या पाठी असेल, त्यांच्या या भूमिकेचा भविष्यात त्यांना फायदा होईल, असे आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषणास बसलेल्या जुन्नरमधील मराठा आंदोलकांनी बेनकेंच्या राजीनाम्याच्या तयारीवर सांगितले. त्यामुळे आता बेनके खरंच राजीनामा देतात का? याकडे लक्ष लागले आहे.

तसं झालं,तर राजीनामा देणारे पहिले आमदार ते ठरतील. सध्याचे राज्य सरकार मराठा आरक्षणप्रश्नी खंबीर नाही, त्यांनीच नाही, तर यापूर्वीच्याही सरकारने मराठा आरक्षणासाठी काही केले नसल्याची टीका त्यांनी केली. परिणामी चांगले गुण मिळूनही संधीपासून समाजातील युवक आरक्षणाअभावी वंचित राहत असल्याने त्याची अवहेलना होत आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ते अद्याप तटस्थ आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com