प्रमोद सावंतांच्या हॅट्‌ट्रीकपुढे अनेक अडथळे होते; पण... : भेगडेंनी उलगडले विजयाचे गणित!

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी वर्तविलेला प्रमोद सावंत यांच्या विजयाचा अंदाज खरा ठरला
pramod sawant-bala bhegde
pramod sawant-bala bhegdeSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी (ता. १०) लागले. पंजाबचा अपवाद वगळता चार राज्यात भाजपला यश मिळाले. गोव्यात तो सर्वात मोठा पक्ष ठरला, त्यामुळे तेथे त्यांची सत्ता कायम राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावरील मतदारांचा विश्वास आणि त्याला मिळालेली कार्यकर्त्यांची साथ यामुळे गोव्यात यश मिळाले अशी प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (pramod swanat) यांच्या साखळी (सांकलीम) मतदारसंघाचे प्रभारी आणि माजी मंत्री बाळा ऊर्फ संजय भेगडे (Bala Bhegade) यांनी ‘सरकारनामा’ला दिली. डॉ. सावंत यांनी विजयाची हॅट्‌ट्रीक केली आहे. (Bala Bhegade's prediction of Pramod Sawant's victory came true)

दरम्यान, अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजपच्या विजयाची पुनरावृत्ती भेगडे यांनी फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यात केली आहे. कारण ते पंढरपूर-मंगळवेढ्याचेही प्रभारी होते. मतदानाच्या दिवसापर्यंत ते तेथे तळ ठोकून होते. त्यांच्या नियोजनामुळे तेथे समाधान आवताडे यांचा विजय झाला. गोव्यातही डॉ. सावंत यांच्या मतदारसंघाचे ते प्रभारी होते. तेथे त्यांना मंगळवेढ्यापेक्षा अधिक बारकाईने प्रचाराचे नियोजन करावे लागले. त्यामुळे या अटीतटीच्या व प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपचा विजय झाला.

pramod sawant-bala bhegde
फडणवीसांनी जबाबदारी सोपवली अन्‌ कल्याणशेट्टींनी यशस्वी करून दाखवली!

फडणवीस यांची गोवा निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती होताच त्यांनी प्रथम भेगडे यांचा आपल्या टीम गोवामध्ये समावेश केला. नंतर त्यांच्याकडे मुख्यमंत्री डॉ. सावंतांच्या मतदारसंघाची जबाबदारी दिली होती, त्यामुळे ते मतदान होईपर्यंत सांखळीत तळ ठोकून होते. तेथील विजयावर गोवा येथून ‘सरकारनामा’शी बोलताना भेगडे म्हणाले, डॉ. सावंत यांच्या हॅटट्रिकपुढे अनेक आव्हाने होती. त्यांच्या पराभवासाठी विरोधकांनी जिवाचं रान केलं होतं. त्याविरोधात व्यूहरचना केली. प्रत्येक मताचे नियोजन केले. उमेदवार निवडून द्यायचा नसून मुख्यमंत्री निवडायचा आहे, असे मतदारांना ठसवले. त्यांना विश्वास दिला. प्रचाराचं योग्य नियोजन केलं; म्हणून सावंतांचा विजय झाला, असे भेगडे म्हणाले.

pramod sawant-bala bhegde
हायकमांडने आदेश देताच सत्तास्थापनेचा दावा करू : फडणवीसांचे वक्तव्य!

गोव्यात प्रथमच पक्ष स्वताच्या ताकदीवर चाळीस जागा लढला आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरला. त्याचे श्रेय फडणवीसांच्या रणनीतीचे व नेतृत्वाचे असल्याचेही भेगडे यांनी केले. मोदी आणि फडणवीसांवरील विश्वासामुळे गोव्यात विजय झाला. आमच्या बरोबर येतील त्यांना घेऊन सरकार बनविणार असल्याचे भेगडे यांनी सांगितले.

pramod sawant-bala bhegde
प्रमोद सावंतांनी सांगितली भाजप सरकार स्थापनेची स्ट्रॅटेजी!

बाळा भेगडेंचे गणित अचूक ठरले

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या महिन्यात १४ तारखेला मतदान झाले, त्याच दिवशी डॉ. सावंतांसह भाजपच्या विजयाचे गणित भेगडे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना मांडले होते. ते बरोबर निघाले. मंगळवेढ्यातील विजयाची पुनरावृत्ती सांखळीत होईल,अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. त्याबाबत ‘मावळच्या बाळा भेगडेंनी सांगितले भाजपसह डॉ. सावंताच्या विजयाचे गणित’ असे वृत्त सरकारनामाने प्रसिद्ध केले होते. गोव्याला डबल इंजिनचे सरकार मिळेल, असे त्यांनी त्यात म्हटले आहे. ही बातमी आणि भेगडेंचे गणित दोन्ही अचूक ठरले. आपल्याला आमदार हवा, की मुख्यमंत्री ही भेगडेंची टॅगलाईन सांखळीतील मतदारांना भावली आणि डॉ. सावंत विजयी झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com