राष्ट्रवादीने डावलेल्या ढमढेरे पिता-पुत्रांनी शक्तीप्रदर्शन करत भरला अर्ज!

बाळासाहेब ढमढेरे हे १९८७ पासून सलग ३५ वर्ष जिल्हा दूध संघावर संचालक आहेत. त्यांनी जिल्हा दूध संघाची १९८७ मध्ये पहिली निवडणूक लढविली होती आणि आतापर्यंत ते संचालक आहेत.
राष्ट्रवादीने डावलेल्या ढमढेरे पिता-पुत्रांनी शक्तीप्रदर्शन करत भरला अर्ज!
Sarkarnama

तळेगाव ढमढेरे (जि. पुणे) : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी, Katraj Dairy) संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (ncp) उमेदवारीत डावलण्यात आलेले ज्येष्ठ संचालक बाळासाहेब जयवंतराव ढमढेरे यांनी आज (ता. १७ फेब्रुवारी) मोठे शक्तीप्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोबत त्यांचा मुलगा छत्रपती पुरस्कार विजेता स्वप्निल ढमढेरे यांनीही शिरूर तालुक्यातून उमेदवारी अर्ज भरला आहे. (Balasaheb Dhamdhere and his son filed an application for Pune District Milk Sangh)

बाळासाहेब ढमढेरे हे १९८७ पासून सलग ३५ वर्ष जिल्हा दूध संघावर संचालक आहेत. ढमढेरे हे सहकार खात्यात विशेषतः दूध व्यवसायात अग्रेसर आहेत. त्यांनी जिल्हा दूध संघाची १९८७ मध्ये पहिली निवडणूक लढविली होती आणि आतापर्यंत ते संचालक आहेत. आतापर्यंत सहा वेळा संचालक म्हणून निवडून आले आहेत. आता सातव्यांदा त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या वयाचा विचार करता मुलगा ॲड. स्वप्निल ढमढेरे यांस निवडणुकीच्या रिंगणात सर्व शक्तीनिशी उतरवतील, अशी चर्चा शिरूर तालुक्यात रंगली आहे.

राष्ट्रवादीने डावलेल्या ढमढेरे पिता-पुत्रांनी शक्तीप्रदर्शन करत भरला अर्ज!
Rohit Pawar : रोहित पवार वाढवणार तानाजी सावंत, बबनराव पाचपुते, आवताडेंचे टेन्शन!

ढमढेरे यांच्या पाठीशी दूध संघातील कामाचा ३५ वर्षांचा दांडगा अनुभव आहे. शिरूर तालुक्यामध्ये १६८ मतदार असून त्यापैकी बहुसंख्य मतदार आपल्याबरोबर असल्याचा दावाही ढमढेरे यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत ढमढेरे यांच्याऐवजी विद्यमान संचालक केशरताई पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ढमढेरे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीने डावलेल्या ढमढेरे पिता-पुत्रांनी शक्तीप्रदर्शन करत भरला अर्ज!
भगिरथ भालके सक्रीय झाले अन्‌ केला मोठा गौप्यस्फोट!

दरम्यान, माझ्या वडिलांच्या वयाचा विचार करता शिरूर तालुक्यातून तरुण म्हणून मला उमेदवारी द्यावी, अशी मागणी स्वप्निल ढमढेरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन केली असल्याचे ढमढेरे यांनी सांगितले. अर्ज भरताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी ढमढेरे यांच्यासोबत आले हेाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com